शबनम न्युज | पिंपरी
‘डी पी यु – आय व्ही एफ व इंडोस्कोपी सेंटर, डॉ.डी.वाय.पाटील रुग्णालय, पिंपरी, पुणे येथील केंद्रामध्ये एक आव्हानात्मक प्रसूतीव्दारे वंध्यत्व उपचाराला मिळाले यश तज्ज्ञ डॉक्टरांना मिळाले आत्मविश्वासाचे बळ.’
सदर महिला गेली चार वर्षापासून मातृत्व प्राप्तीसाठी उपचार घेत होती, पण यश काही मिळाले नाही. निराश मानसिकतेत त्या डी पी यु – आय व्ही एफ सेंटर मध्ये आल्या, त्यांची शारीरिक, मानसिक व आरोग्य स्थिती सुधारणे हे फार मोठे आव्हान डॉक्टरांपुढे होते. तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वंध्यत्व उपचारांला त्यांची सकारात्मक साथ मिळाली आणि सुप्रसिद्ध वंध्यत्वरोग तज्ज्ञ डॉ.सुनीता तांदूळवाडकर यांच्या नेतृत्वाखाली उपचार पूर्ण झाले. या केंद्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून काही दिवसातच गर्भधारणापुर्ण झाली. ती संपूर्ण नऊ महिने तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली होती. नुकतेच एका गोंडस बाळाचा तीने जन्म दिला परिवारातील आनंदाचा क्षण सर्वांनीच अनुभवला. या केंद्रामधील ही एक आव्हानात्मक व अभिमानास्पद कामगिरी असल्याचे डॉ. सुनीता तांदुळवाडकर यांनी सांगितले, त्यापुढे म्हणाल्या प्रगत तंत्रज्ञान व प्रदीर्घ अनुभव यांच्या साथीने कृत्रिम गर्भधारणेतून गरजू जोडप्यांना पालकत्वाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.
डॉ.डी.वाय.पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ.पी.डी.पाटील व प्र-कुलपती डॉ. भाग्यश्री पाटील, विश्वस्त व कोषाध्यक्ष डॉ. यशराज पाटील यांनी सहभागी सर्व डॉक्टर्स व इतर स्टाफचे कौतुक केले तसेच पुढच्या कामाला शुभेच्छा दिल्या.
या यशामध्ये डॉ. सुनीता तांदुळवाडकर, डॉ. राजेंद्र शितोळे, डॉ. बुशरा खान, डॉ.मधुकर शिंदे, पवन कुलकर्णी, डिंपल देसाई, डॉ. शीतल तापकिरे यांचा मोलाचा सहभाग होता.
महिलांना नैसर्गिकरित्या गर्भधारणा होत नाही, अशा परिस्थितीत आयव्हीएफ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून स्त्रीच्या शरीरातून स्त्री बीज काढून ती पुरुषाच्या शुक्राणूमध्ये आयव्हीएफ लॅबमध्ये मिसळली जाते, ज्यामुळे गर्भाधानाची प्रक्रिया पूर्ण होते आणि गर्भ तयार होतो, जो नंतर स्त्रीच्या गर्भाशयात रोपण केला जातो. ही प्रक्रिया नैसर्गिक संकल्पनेपेक्षा वेगळी आहे कारण यामध्ये भ्रूण निर्मितीचे काम शरीराबाहेर प्रयोगशाळेत होते, परंतु त्यानंतर ही संपूर्ण प्रक्रिया नैसर्गिक गर्भधारणेसारखीच असते, हे समजून घेतले पाहिजे. आज विज्ञान, तंत्रज्ञान आणि तज्ञ डॉक्टरांच्या मदतीने कित्येक अपत्यहीन स्त्रियांचे मातृत्वाचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याचे काम हे तंत्र करीत आहे. डॉ. सुनीता तांदुळवाडकर यांच्या नेतृत्वाखाली प्रगत तंत्रज्ञान आणि अत्यंत अनुभवी टीमसह पुण्यातील पिंपरी येथील डॉ. डी. वाय.पाटील रुग्णालयात हे जागतिक दर्जाचे युनिट सुरू करण्यात आले आहे. गरजू जोडप्यांचे मातृत्वाचे स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. या क्षेत्रात उपलब्ध असलेल्या सर्वांत प्रगत तंत्रज्ञानापैकी एक टाइम लॅप्स इमेजिंग एम्ब्रिओस्कोपची सुरवातही नुकतीच करण्यात आली आहे.
केंद्राविषयी आणि या तंत्रज्ञानाविषयी सर्वात महत्त्वाच्या गोष्टींपैकी एक म्हणजे केंद्रात प्रजनन उपचारांची जोडप्यांच्या वैयक्तिक गरजेप्रमाणे रचना केली जाते. आयव्हीएफ लॅबमधील अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे हे साध्य झाले आहे. सर्वोत्तम भ्रूण निवडीसाठी टाइम लॅप्स इमेजिंग वापरणारे हे पुण्यातले पहिले केन्द्र आहे. रुग्णांना सर्वसमावेशक, परवडणारी आणि उच्च दर्जाची प्रजनन सेवा देण्यासाठी या केंद्रामार्फत वंध्यत्वाची विविध कारणे असलेल्या अनेक रुग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत. आयव्हीएफ प्रक्रिया नेमकी कुणासाठी गरजेची ठरते, या प्रश्नाचे उत्तर द्यायचे तर महिलांच्या बाबतीत अनियमित पाळी, स्त्रीबीज कमी असणे अथवा सक्षम नसणे, अधिक वय, गर्भनलिका बंद असणे, गर्भाशयामध्ये अथवा बीजांडामध्ये गाठी असणे आणि पुरुषांच्या बाबतीत शुक्राणू नसणे, शुक्राणू कमी अथवा खराब गुणवत्तेचे असणे, कमी हालचालींचे शुक्राणू, अशी कारणे सांगता येतात.