शबनम न्युज / पिंपरी चिंचवड
डेक्कन क्वीन किंवा सिंहगड एक्सप्रेस पुणे मुंबई गाडी चालू करण्यात यावी, असे मागणीचे निवेदन भाजप कार्यकर्ते विशाल वाळुंजकर यांनी डिव्हिजन रेल्वे मॅनेजर रेणू शर्मा यांना दिले आहे.
सदर निवेदनात नमूद केले आहे कि, पुणे मुंबई डेक्कन क्वीन किंवा सिंहगड एक्सप्रेस गाडी चालू करण्यात यावी, गेल्या अनेक दिवसांपासून अनेक प्रवाशांकडून या वेळेत मागणी करण्यात येत आहे.
पुणे मुंबई दरम्यान डॉक्टर,वकील अत्यावश्यक सेवेतील अधिकारी कर्मचारी कामानिमित्त मुंबई-पुणे ये-जा करण्यासाठी मोठ्या अडचणी येत असून यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. खाजगी वाहनचालकांकडून मोठ्या प्रमाणावर लूट केली जात असून ते परवडणारे नाही तरी अत्यावश्यक सेवेमधील प्रवाशांची दिरंगाई लक्षात घेऊन पुणे मुंबई डेक्कन क्वीन, सिंहगड एक्सप्रेस गाडी चालू करण्यात यावी, असे हि विशाल वाळुंजकर यांनी निवेदनात म्हंटले आहे.