शबनम न्युज / पुणे
कोरोना सारख्या महामारीचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होत असताना देखील रक्तदात्यांनी केलेलं रक्तदान हे किती महत्वाचे आहे. आपण समजाचे घटक म्हणून आपणही समाजाचे कांहीं देणं लागतो या भावनेतून मोठ्या प्रमाणावर नॅशनल असोसिएशन ऑफ कॉर्पोरेट केटरर्स तर्फे महारक्तदान शिबिराचे आयोजन 26 मे 2021रोजी पुणे कॅम्प येथील आझम कॅम्पस, रंगूनवाला इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड रिसर्च येथे आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे शहराचे सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर होते .याप्रसंगी महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष पी. ए. इनामदार, महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन सोसायटीच्या उपाध्यक्ष आबेदा इनामदार यांची सन्माननीय उपस्थिती होती. रुबी हॉल आणि ससून रुग्णालय ब्लड बँक च्य साहाय्याने १०० हून अधिक रक्त पिशवी संकलन करण्यात आले.
नॅशनल असोसिएशन ऑफ कॉर्पोरेट केटरर्स संघटनेचे महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी चेंबर ऑफ हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री, न्यू पुणे केटरिंग असोसिएशन, महाराष्ट्र केटरिंग असोसिएशन, पुणे साऊंड इलेक्ट्रिकल जनरेटर इव्हेंट्स इक्यूपमेंट व्हेंडर असोसिएशन, मानवाधिकार सुरक्षा संघ, फ्रीडम इव्हेंट्स या संस्थांनी एकत्र येत रक्तदाबाचा उपक्रम राबविल होता.
या महारक्तदान शिबिराचे संयोजन जी. एस. बिंद्रा, नवीन राय, ओमकार द्रविड, उमेश शिंदे, सनी अवसरमल, रणजित तळे, योगेश तुरवणकर, राजन स्वामी, अब्बास पारेख, किशोर सरपोतदार ,बबलू रमझानी, वैभव पाटील ,अमित गाडेकर, आनंद पुजारी, जिमी जोसेफ, जगजीत सिंग आदींनी केले होते.