शबनम न्युज | पुणे
प्रियकराच्या धमकीने कंटाळून पतीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार मारुंजी मध्ये घडला आहे. पत्नीसोबत असलेल्या अनैतिक संबंधाबाबत पतीने जाब विचारला असता, प्रियकराने पतीलाच “एक दिवस तुझा काटा काढून तुझ्या बायकोला मी घेऊन जाणार” असे म्हणत जिवेमारण्याची धमकी दिली. या त्रासाला कंटाळून पतीने पत्नीला पुण्यात राहण्यासाठी आणले, पण प्रियकर हा पुण्यातही आला. आणि पतीला जिवेमारून पत्नीला घेऊन जाण्याची धमकी दिली, या सर्व मानसिक त्रासाला कंटाळून पतीने आत्मह्त्या केली.
ही घटना जुलै २०२२ ते १७ सप्टेंबर २०२२ या कालावधीत केज, बीड आणि शिंदे वस्ती, मारुंजी येथे घडली. याप्रकरणी आत्महत्या केलेल्या व्यक्तीच्या बहिणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी अजिंक्य शिवाजी घुले (रा. टाकळी, बीड) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Advertisement