यशस्वी‘संस्थेच्यावतीने आंतरराष्ट्रीय योग दिन ऑनलाईन पद्धतीने साजरा.
पिंपरी : दिनांक 22 जून २०२१ : दरवर्षीप्रमाणे यंदाही आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्याची परंपरा पुण्यातील ‘यशस्वी’ संस्थेने कायम राखली आहे.कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सगळ्यांना एकत्र येऊन मोठ्या प्रमाणात सामुहिक योग प्रात्यक्षिके सादर करता येऊ शकत नसल्याने युट्युब लाईव्हद्वारे हे सोमवारी सकाळी १० वाजता या ऑनलाईन योग प्रात्यक्षिकांना सुरुवात झाली.
यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट सायन्सव विवेकानंद केंद्र कन्याकुमारी शाखा पिंपरी चिंचवड यांच्या सयुंक्त विद्यमाने हे ऑनलाईन योग प्रात्यक्षिक सत्र आयोजित करण्यात आले होते. सुरुवातीला विवेकानंद केंद्राच्या अस्मिता करमरकर यांनी ओंमकार गुंजन घेतले व मृदुला करमरकर यांनी प्रार्थना गीत गायन केले.
अर्चना डोबा यांनी विवेकवाणी सादर केले, तर ‘यशस्वी’ संस्थेचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी यांनी सर्वांना योग दिना निमित्त शुभेच्छा दिल्या,अरुणाताई मराठे यांनी विवेकानंद केंद्राच्या विविध उपक्रमांविषयी माहिती दिली. तर मुख्य सत्रात योग प्रशिक्षक अविनाश गोखले यांनी मनोगतातून महत्व पटवून देत विविध योग प्रात्यक्षिके करवून घेतली.
साधारणतः तासभर चाललेल्या या योग वर्गात ‘यशस्वी’ संस्थेचे पुणे मुख्यालय,चिंचवड येथील आयआयएमएस, येथील हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट, संतमाई स्किल डेव्हलपमेंट सेंटर, जालना जिल्ह्यातील महाराष्ट्र कौशल्य विकास केंद्र व देशभरातील २४ राज्यातील
१२०० कर्मचारी व विद्यार्थी सुद्धा ऑनलाईन सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट सायन्स डॉ. शिवाजी मुंढे यांनी केले, तर सूत्रसंचालन शर्मा यांनी केले.