शबनम न्युज / पिंपरी
स्वदेशी जागरण मंच पिंपरी चिंचवड महानगर व रोपवाटिका ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने वटपौर्णिमे निमित्त महिलांनी वडाचे झाड लावून व त्याची पूजा करून सण साजरा केला.
भारतीय संस्कृती मध्ये सणांना अनन्य साधारण महत्व आहे. प्रत्येक सणाचे शास्त्रीय महत्व आहे. वटपौर्णिमा या दिवशी स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात. या पूजेचा शास्त्रीय अर्थ बघायचा म्हणलं तर वडाच्या झाडा मुळे सर्वात जास्त ऑक्सिजन मिळतो. त्याच बरोबर वडाच्या झाडाचे प्रत्येक गोष्ट म्हणजे मूळ,साल,पान, पारंबी,फळ या प्रत्येकाचा उपयोग होतो. आणि अश्या या बहुउपयोगी झाडाची पूजा पण मधिल काही काळ पूजा करायची म्हणून झाडाच्या फांद्या तोडून त्याची पूजा केली जायची हे थांबण्यासाठी म्हणून आपण दर वर्षी वडाचे झाड लावून त्याची पूजा करायचा संकल्प केला आहे.आणि या उपक्रमाची सुरवात आज झाली.
या कार्यक्रमासाठी शैलजा मोरे यांचे सहकार्य लाभले. तसेच निवेदिता कच्छवा, उत्कर्षा कुलकर्णी, शिल्पा बिबीकर, स्मिता मोडक आदी उपस्थित होते.
हा उपक्रम मल्लिकार्जुन मंदिर ,सेक्टर 26, निगडी प्राधिकरण येथे 30 महिलांच्या उपस्थित पार पडला.