- नगरसेविका विनया तापकीर यांनी प्रभागातील महिलांचा सर्वांगीण विकास करण्याचा उचलला विडा
- महाराणी येसूबाई सखीमंच ची नगरसेविका विनया तापकीर यांनी केली स्थापना
- महाराणी येसूबाई सखीमंच मध्ये सहभागी होण्यासाठी करावी लागणार नोंदणी
शबनम न्युज / पिंपरी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 3 च्या नगरसेविका विनया प्रदीप तापकीर यांनी महिलांसाठी, महिलांच्या विकासासाठी एक नवीन उपक्रम सुरु केले आहे. महाराणी येसूबाई सखीमंच ची स्थापना नगरसेविका विनया तापकीर यांनी केली असून या मंचाच्या मार्फत महिलांना या सखी मंचचे सदस्यत्व देऊन महिलांचा विकास हाती घेतला आहे.
महाराणी येसूबाई सखीमंच मध्ये महिलांना सहभागी करून घेऊन महिलांसाठी अनेक विविध उपक्रम या सखीमंच वतीने राबविले जाणार आहेत. यामध्ये महिलांचा सर्वांगीण विकास करणे, महीलांसाठी लघु उद्योग निर्मिती करणे, तसेच या उद्योग विषयी मार्गदर्शन करणे, महिलांना सक्षम करून स्वतःच्या पायावर उभे करणे, त्याचप्रमाणे महिलांसाठी सहलीचे आयोजन करणे, महिलांचे मोठ्या प्रमाणात बचत गट स्थापन करणे, महिलांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धात्मक कार्यक्रम आयोजित करणे, तसेच या सखीमंच मध्ये सदस्यत्व घेणाऱ्या महिलांना आकर्षक भेटवस्तू देणे व अति महत्त्वाचे म्हणजे महिलांना सेल्फ डिफेन्स ट्रेनिंग देणे असे विविध उपक्रम नगरसेविका विनया प्रदीप तापकीर यांनी स्थापन केलेल्या महाराणी येसूबाई सखीमंच वतीने घेण्यात येणार असल्याची माहिती नगरसेविका विनया तापकीर यांनी दिली.
या महाराणी येसूबाई सखीमंच मध्ये सहभागी होण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. सदरची नोंदणी नगरसेविका विनया प्रदीप तापकीर यांचे जनसंपर्क कार्यालय येथे सुरू आहे. तरी जास्तीत जास्त महिलांनी या सखीमंचचे सदस्य व्हावे, असे आवाहन नगरसेविका विनया प्रदीप तापकीर यांनी केले आहे.