शबनम न्यूज / पिंपरी चिंचवड
पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी परिसरातील मनसे चे युवा नेते सुनील कदम यांनी नुकतीच कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली लस घेतल्यानंतर सुनील कदम यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना आवाहन केले आहे की कोरोना संपवायचा असेल तर प्रतिबंधात्मक लस घेणे आवश्यक आहे, मी ही लस घेतली आहे, आपणही घ्यावी ही, लस सुरक्षित असून यापासून कोणताही धोका नाही तसेच शासनाने कोरोना संदर्भात दिलेल्या नियमांचे पालन करावे, मास्क वापरावे, सामाजिक अंतर ठेवावे ,आवश्यक नसताना घराबाहेर पडू नये ,गर्दीची ठिकाणे टाळावी असेही आवाहन सुनील कदम यांनी केले
Advertisement