शबनम न्युज / पिंपरी
आज जागतिक डॉक्टर डे यानिमित्ताने कोरोना महामारी काळात ज्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता, रुग्णांची सेवा केली, अशा डॉक्टर कोरोना योद्धांना आज सन्मानित करण्यात येत आहे. यानिमित्ताने पिंपरी-चिंचवड शहरातील स्वीकृत प्रभाग सदस्य अनिकेत राजेंद्र काटे व दापोडी परिसरातील ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या वतीने दापोडी, सांगवी परिसरातील आरोग्य विभागामध्ये अहोरात्र रुग्णांची सेवा करणाऱ्या डॉक्टरांचे तुळशीचे रोप व पी.पी तिकीट देऊन कृतज्ञता व्यक्त करीत त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी दापोडी सांगवी परिसरातील आदी मान्यवर उपस्थित होते.
Advertisement