शबनम न्युज | पुणे
मराठवाडा समन्वय समिती पुणे शहर यांच्या वतीने ‘मराठवाडा मुक्ती दिन महोत्सव २०२२’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मराठवाड्यातील कर्तृत्ववान व्यक्तींना पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील तमाम मराठवाडावासीय व पुणेकरांच्या वतीने “मराठवाडा भूषण पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणूनसयाजी शिंदे(चित्रपट निर्माते,अभिनेते संस्थापक-सह्याद्री देवराई फाउंडेशन)व कार्यक्रमाचे अध्यक्ष मराठवाडा भुषणमा अंकुश शिंदेसाहेब (पोलीस आयुक्त पिंपरी-चिंचवड.पुणे) यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम पार पाडण्यात आला.यावेळी “वैभवशाली मराठवाडा 2022” या वार्षिक विशेषाकाचे मान्यवरांच्या शुभहस्ते प्रकाशन करण्यात आले. या वेळी पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील मराठवाडा मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.