शबनम न्यूज / पुणे
पुणे विभागातील 16 लाख 54 हजार 923 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 17 लाख 37 हजार 92 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 46 हजार 20 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 36 हजार 149 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.08 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 95.27 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 10 लाख 56 हजार 894 रुग्णांपैकी 10 लाख 28 हजार 814 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 10 हजार 177 आहे. कोरोनाबाधित एकूण 17 हजार 903 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.69 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 97.34 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 97 हजार 451 रुग्णांपैकी 1 लाख 82 हजार 752 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 9 हजार 928 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 771 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 65 हजार 241 रुग्णांपैकी 1 लाख 58 हजार 649 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 175आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 417 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 50 हजार 937 रुग्णांपैकी 1 लाख 36 हजार 814 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 9 हजार 961 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 162 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 66 हजार 569 रुग्णांपैकी 1 लाख 47 हजार 894 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 13 हजार 779 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 896 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 4 हजार 329 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 658, सातारा जिल्ह्यात 594, सोलापूर जिल्ह्यात 228, सांगली जिल्ह्यात 1 हजार 174 तर कोल्हापूर जिल्ह्यात 1 हजार 675 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 4 हजार 305 आहे. पुणे जिल्हयामध्ये 881, सातारा जिल्हयामध्ये 126, सोलापूर जिल्हयामध्ये 246, सांगली जिल्हयामध्ये 960 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 2 हजार 92 रुग्णांचा समावेश आहे.
विभागातील लसीकरणाचे प्रमाण
पुणे विभागात आजपर्यंत लसीकरण झालेल्या नागरिकांमध्ये पुणे जिल्हयामध्ये 43 लाख 2 हजार 863, सातारा जिल्हयामध्ये 9 लाख 45 हजार 962, सोलापूर जिल्हयामध्ये 7 लाख40 हजार 333, सांगली जिल्हयामध्ये8 लाख 97 हजार 649 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 13 लाख 4 हजार 402 नागरिकांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 कोटी 10 लाख 10 हजार 779 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 17 लाख 37 हजार 92 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.