शबनम न्युज / पिंपरी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत नोकर भरती करावी तसेच पिंपरी-चिंचवड शहरातील कंत्राटी कामगारांना किमान वेतन देण्यात यावे अशी विनंती सामाजिक कार्यकर्ते विक्रम पवार यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे.
दिलेल्या पत्रात विक्रम पवार यांनी नमूद केले आहे की पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या 25 ते 30 लाखावर पोहोचली आहे अनेक युवक बेरोजगार आहेत तसेच पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेत कर्मचाऱ्यांवर कामाचा बोजा वाढला आहे. अशावेळी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत नोकर भरती करावी, जेणेकरून युवकांना रोजगार मिळेल तसेच यापूर्वी आदिवासी युवकांना रोजगार देऊन स्वतःच्या पायावर उभे केले त्याबद्दल शहराच्या वतीने आपले हार्दिक अभिनंदन असे ही सामाजिक कार्यकर्ते विक्रम पवार यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे
Advertisement