शबनम न्यूज / पिंपरी
पिंपरी-चिंचवड – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विद्यमान भाजप नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी आपल्या प्रभागातील विकास कामांना गती दिली आहे. प्रभागातील नागरिकांच्या अडचणी सोडविण्यावर नगरसेविका अनुराधा गोरखे या भर देत आहेत, नेहमी प्रभागातील नागरिकांच्या अडी अडचणी दूर करण्यासाठी तत्पर असलेल्या नगरसेविका म्हणून त्यांची प्रभागात ओळख निर्माण झाली आहे. ते दररोज प्रभागातील अडी अडचणी, प्रश्न समस्या सोडविण्यावर भर देत असतात. त्यांच्या प्रभागातील शाहूनगर चौकात नेहमी वाहनांची वर्दळ असते मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची शक्यता असते याकरिता तेथे स्पीड ब्रेकर बसविण्याचे काम प्रगतीपथावर करण्यात आले, तसेच प्रभागातील संभाजीनगर रहिवाशांसाठी मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असल्याने ट्रॅफिक जाम होत होती कमानी कडे जाणाऱ्या रस्त्यावरचा रोड दुभाजक कायमचा काढून टाकण्यात आला यामुळे येथील नागरिकांना ट्रॅफिक जामची अडचण दूर झाली नगरसेविका अनुराधा गोरखे यांच्या प्रयत्नातून हे काम पूर्ण झाले याबद्दल नागरिकांनी त्यांचे आभार व्यक्त केले.