शबनम न्यूज / पिंपरी
पिंपरी-चिंचवड – सोमवार दि. १२.०७.२०२१ रोजी पिंपरी विधानसभेचे आमदार मा. अण्णासाहेब बनसोडे व पिंपरी महावितरण कार्यालयाचे कार्यकारी अभियंता यांना पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, सचिव जयंत कड, संचालक प्रमोद राणे, विनोद मित्तल यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका औद्योगिक परिसरातील एम.आय.डी.सी. चिंचवड मधील डी-१, डी-२, डी-३ ब्लॉक, संघवी compound, परमार कॉम्प्लेक्स, आकुर्डी इंडस्ट्रियल इस्टेट, पिंपरी, एच ब्लॉक, या ठिकाणी उद्योजकांना येणाऱ्या विविध अडचणीचे निवेदन दिले.
विविध समस्या खालीलप्रमाणे
१. फिडरला अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटणे.
२. फिडर CRIMPING .
३. फिडरच्या वीज वाहणाऱ्या तारांचे झोल कमी करणे.
४. फिडर पिलर मधील HRC,FUSE WIR व आतील खराब झालेले पार्टस बदलणे व खराब झालेले दरवाजे बदलणे.
५. वेगवेगळ्या साईजचे केबल STOCK मध्ये ठेवणे व गरजेच्यावेळी २४ तास उपलब्ध करून देणे कारण बऱ्याच वेळेला केबल उपलब्ध नसते.
६. केबल नादुरुस्त ( FOULT FINDING VEHICALS ) वेळेवर उपलब्ध करून देणे.
७. फिडरची लांबी कमी करणे.
८. OVER लोडेड TRANSFORMER वरचा लोड कमी करणे व त्यातील OIL ची पातळी आवश्यक तेवढीच ठेवणे व आवश्यक त्या ठिकाणी नवीन TRANSFORMER बसविणे.
९. महावितरणच्या पिंपरी-चिंचवड औद्योगिक विभागासाठी DPR साठी हेड ऑफिसला पाठपुरावा करणे.
१०. सध्या अस्तित्वात असलेली स्विचिंग स्टेशन्स ओवर लोड आहेत त्यांची संख्या वाढविणे.
११. आवश्यक ठिकाणी GOD बसविणे.
१२. औद्योगिक परिसरातील संबंधित विभागातील LINE MEN ची संख्या वाढविणे.
१३. whatsup GROUP मधील तक्रार MSEDCL च्या अधिकाऱ्यांनी बघून त्या तक्रारीचे त्वरित निराकरण करावे.
१४. दर महिन्याला कार्यकारी अभियंता यांनी संघटना पदाधिकारी यांचेबरोबर मिटिंग घेऊन झालेली कामे यांचा आढावा घ्यावा.
१५. महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी shutdown घेऊन PREVENTIVE MAINTANCE ची कामे मार्गी लावणे.
१६. थकीत वीज बिलांचे वीज ग्राहकांना तत्काळ सुलभ हप्ते करून देणे.
१७. ज्या ठिकाणी अंडर ग्राउंड वीज वाहक केबल टाकणे शक्य आहे त्या ठिकाणी भूमिगत वीज वाहक केबल टाकणे.
१८. वीज कनेक्शन कट करण्या पूर्वी वीज ग्राहकाला दोन दिवस अगोदर कल्पना देणे.
१९. महावितरणच्या पिंपरी व चिंचवड विभागातील खंडित वीज पुरवठ्याच्या तक्रारी प्रंचंड प्रमाणात वाढलेल्या आहेत. या विभागातून सदर तक्रारीकडे दोन दोन दिवस कोणीही लक्ष देत नाही. त्यावर उपाययोजना करणे व कायमस्वरूपी कार्यक्षम अधिकारी नेमणे.
वरील सर्व गोष्टीची पूर्तता करणे व चालू असणारा पावसाळा व सध्या असलेले POWER INTRUPTION ला ब्रेक लावणे. अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत