आमदार अण्णा बनसोडे , नगरसेविका मंगला कदम यांच्या सह महावितरणचे कार्यकारी अभियंता यांची घेतली भेट
शबनम न्यूज / पिंपरी
पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग क्र. १० संभाजीनगर, शाहूनगर येथे मागील काही दिवसापासून सातत्याने वारवांर वीज पुरवठा खंडीत होणे, विस्कळीत होण्याचे प्रकार घडत आहेत. सध्या कोरोना विषाणू संसर्गांच्या पार्श्वभूमीवर शहरातील शाळा तसेच उद्योग धंदे बंद आहेत. त्यामुळे शाळेचे विद्यार्थी ऑन लाईन शिक्षण घेत आहेत तर कर्मचारी वर्ग वर्क फॉर्म होम करत आहे. परंतु वारवांर विस्कळीत होणा-या वीज पुरवठ्यामुळे विद्यार्थ्यांच्या ऑन लाईन शिक्षणामध्ये खंड पडत आहे तसेच जे कर्मचारी घरुन काम करीत आहेत त्यांना देखील त्रास होत आहे.
खंडीत वीज पुरवठ्याचा प्रकार वारवांर घडत असल्यामुळे संभाजीनगर व शाहूनगर परीसरातील नागरीकांना तक्रारी केल्या त्यामुळे कुशाग्र कदम यूथ फाऊंडेशनच्या पुढाकाराने पिंपरी विधानसभेचे मा.आमदार अण्णा बनसोडे, ज्येष्ठ नगरसदस्या मंगलाताई कदम, कुशाग्र कदम यूथ फाऊंडेशनचे अध्यक्ष कुशाग्र कदम, योगेश मोरे, स्वप्नील सराटकर, आयुष्य भुजबळ, संतोष वऱ्हाडी, अमर कांबळे, दर्शन बोडके, महावितरणचे कार्यकारी अभियंता राहुल गवारे, अधिकारी मिलिंद चौधरी, शिल्पा ढेपे व परीसरातील नागरीक यांच्या उपस्थित खंडीत वीज पुरवठ्या सुरळीत करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी बैठक घेण्यात आली.
याप्रसंगी महावितरणचे कार्यकारी अभियंता राहूल गवारे यांनी खंडीत वीज पुरवठा होण्याची कारणे शोधून या परीसरातील वीज पुरवठा नियमित करण्याबाबत आश्वासन दिले.
त्याच प्रमाणे प्रभाग क्रमांक ९ मधे पेव्हींग ब्लॉक बसविणेबाबत नागरीकांनी मागणी केली त्यावर प्रभागामध्ये पेव्हींग ब्लॉक बसविणेबाबत मा. अण्णा बनसोडे यांनी आश्वासन दिले,तसेच प्रभागातील इतर समस्याही त्वरीत सोडविल्या जातील असेही या प्रसंगी सांगितले.