शबनम न्यूज / पुणे
प्रतिनिधि – दिलीप सोनकांबळे
चाकण : पुण्याच्या खेड तालुक्यातील चाकण परिसरात हृदय हेलावून टाकणारी घटना घडली असून या घटनेनं पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. येथे प्रेयसीला पळवून नेणाऱ्या प्रियकराची आणि त्याच्या मित्राची मुलीच्या वडिलांनी नातेवाईकांच्या मदतीने निर्घृण हत्या केली आहे.
राहुल दत्तात्रय गावडे (वय 28 ) बाळू सिताराम गावडे (वय 26 दोघे रा. आसखेड खुुर्द, ता. खेड) अशी हत्या झालेल्या दोघांची नावे आहेत. या प्रकरणी पोलिसांनी 6 जणांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील करंजविहिरे (ता.खेड ) येथील हॉटेल माणुसकीच्या समोर हॉटेल मालक बाळू मरगज यांची वीटभट्टी आहे.
हे दोघे वीटभट्टीवर काम करत होते. यातील बाळू सिताराम गावडे याने हॉटेल मालक यांची 21 वर्षीय मुलीचे प्रेमसंबंध निर्माण झाले. 14 तारखेला दोघेही मित्र राहुल दत्तात्रय गावडेच्या मदतीने पळून गेले होते.
मुलीला पळून नेल्याचा राग हॉटेल मालक आरोपी बाळू मरगज याच्या मनात होता. त्याने नातेवाईकांच्या मदतीने तिघांचा शोध घेतला आणि त्यांना हॉटेल माणुसकी या ठिकाणी आणून तापलेल्या लोखंडी रॉड व लाकडी दंडुक्यांनी बेदम व अमानुषपणे मारहाण केली. यात दोघांचा जागीच तडफडून मृत्यू झाला. तर मुलीलाही जबर मारहाण करण्यात आली असून तिची परिस्थिती चिंताजनक आहे.
वीटभट्टीवर काम करताना दोघांचे जुळले प्रेमसंबंध.मयत बाळू गावडे याचा विवाह झालेला होता. त्याला दोन मुलंही आहेत. दरम्यान, बाळू करंजविहिरे येथील वीटभट्टीवर कामाला होता. मे महिन्यात वीटभट्टी मालक याच्या मुलीवर बाळूचं प्रेम जडलं. तर, त्यानंतर 21 वर्षीय तरुणीनं बाळूच्या प्रेमाला होकार दिला.
दोघांच्या प्रेमसंबंधांची माहिती बाळूचा मित्र राहुल गावडे याला होती. दरम्यान, 14 जुलै रोजी त्यांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला आणि तसा प्लॅनही केला. यात राहुलने दोघांना मदत केली. राहुलनेच या दोघांना खोपोली परिसरात दुचाकीवरून सोडले होते.
मुलगी व पळून नेणारे बाळू ,राहुल यांचा नातेवाईकांनी शोध घेऊन त्यांना या मारहाणीत बाळू व राहुल या दोघांचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी त्याठिकाणाहून पळ काढला.
मात्र, पोलिसांनी अनिल संभाजी कडाळे,राजू साहेबराव गावडे,किरण बाळू मेंगाळ, चंद्र करा उर्फ मुक्ता बाळू गावडे,आनंदा सीताराम जाधव,बाळू मरगज( हॉटेल मालक) यांना अटक केली आहे. पुढील तपास चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस करीत आहे.