शबनम न्यूज / पिंपरी
शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार अभियान सुरू आहे. शिवसेना पिंपरी चिंचवड तर्फे हा उपक्रम चालु करण्यात आला. या अंतर्गत शहर शिवसेनेकडुन “शहरप्रमुख शाखाप्रमुखांच्या घरी” असा अत्यंत अनोखा उपक्रम राबवण्यात येत आहे.शिवसेनेचे शहर प्रमुख, नगरसेवक सचिन भोसले ,पिंपरी विधानसभा प्रमुख राजेश वाबळे ,शहर समन्वयक रोमी संधू पिंपरी विधानसभा प्रमुख सौ.सरिता साने यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम घेण्यात आला.
यावेळी शिवसेना उपशहरप्रमुख तुषारभाऊ नवले, पिंपरी युवतीसेना प्रमुख प्रतिक्षा घुले,कार्यालय सचिव ज्ञानेश्वर शिंदे,नितिन घोलप,विशाल चव्हाण,श्रीकांत घुले सर, रवि कोवे सर विभाग प्रमुख नामदेव घुले,नंदुकुमार देवकर,शाखाप्रमुख संतोष गायकवाड, नवनाथ घुले,सागर गिरी, नितेश तेजी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी मान्यवरांनी, शाखानिहाय बैठका घेऊन सर्व शिवसैनिकांनी एकत्र येऊन शिवसेनेचे स्वबळ वाढवणे यावर विचार मांडले.