बुथ बांधणी मजबूत करण्यासाठी शिवसैनिक लागले कामाला
शबनम न्युज / पिंपरी चिंचवड
आगामी पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेचा भगवा झेंडा फडकविण्यासाठी शिवसैनिक सज्ज झाले आहेत. महापालिकेत शिवसेनेचा महापौर करण्यासाठी शिवसैनिकांनी निर्धार केला आहे. त्याकरिता शिवसेनेने राबविलेल्या संपर्क अभियानाला पिंपरी विधानसभेत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. त्यानुसार प्रभागातील बुथ बांधणी मजबूत करून प्रत्येक बुथवर दहा शिवसैनिकांची टीम तयार करण्यात येत आहे. अशी माहिती शिवसेनेचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक ऍड. सचिन भोसले यांनी दिली.
राज्याचे मुख्यमंत्री, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, पर्यटनमंत्री, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने राज्यातील जनतेच्या हितासाठी लोककल्याणासाठी राबविलेल्या योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम संपर्क अभियानाच्या माध्यमातून केले जात आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत, पश्चिम महाराष्ट्र समन्वयक रवींद्र मिर्लेकर, संपर्कप्रमुख बाळा भाई कदम, शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे, शिवाजी आढळराव पाटील, गजानन बारणे यांच्या मार्गदर्शनाने हे अभियान राबविण्यात येत आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात संपर्क अभियानाच्या माध्यमातून पक्षाचा विचार तळागाळात पोहोचविण्यात येत आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात संपर्क अभियान राबविण्यात येणार आहे. शहरात शिवससेनेचे विचार, ध्येय धोरणे प्रत्येकांच्या घरोघरी पोहोचविण्याचे काम सुरू आहे. 14 जुलै ते 17 जुलैपर्यंत पिंपरी विधानसभा मतदार संघात हे अभियान राबविण्यात आले.
निगडी प्राधिकरण, आकुर्डी, काळभोर नगर, संभाजी नगर ,शाहूनगर, पिंपरी गाव, बोपोडी, दापोडी, कासारवाडी, बोपखेल या परिसरात प्रत्येक शिवसेनेचे शाखाप्रमुख, उपशाखा प्रमुख, कार्यकर्ते आदींच्या गाठीभेटी घेऊन त्यांना संपर्क अभियानातून शिवसेनेचे संघटन मजबूत करण्यास मार्गदर्शन करण्यात आले. या अभियानात शिवसेनेचे मधुकर बाबर, संपर्कप्रमुख योगेश बाबर, नगरसेवक अमित गावडे, नगरसेवक प्रमोद कुठे, विशाल यादव, नगरसेविका मीनल यादव, महिला अध्यक्षा उर्मिला काळभोर यांच्यासह आदी पदाधिकाऱ्यांच्या गाठी -भेट घेऊन संपर्क अभियानातून संघटन अधिक मजबूत करण्यावर विचार विनिमय करण्यात आले.
यावेळी पिंपरी विधानसभा प्रमुख राजेश वाबळे, शहर संघटक रोमी संधू ,शहर समन्वयक भाविक देशमुख, उपशहर प्रमुख तुषार नवले, उपशहर प्रमुख अमोल निकम, उपशहर प्रमुख पांडुरंग पाटील, कार्यालय प्रमुख ज्ञानेश्वर शिंदे, विजय गुप्ता, सरिता साने, जावेद आतार यांच्या सर्व शाखा प्रमुख उपशाखाप्रमुख शिवसैनिक उपस्थित होते.