शबनम न्युज / पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरात विविध उपक्रम राबविले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील भाजप नगरसेविका सारिका बोऱ्हाडे व युवा नेते नितीन बोऱ्हाडे यांनी आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली चिंबळी येथील ओम शांती अनाथ मुलींचे आश्रम येथे अन्नधान्य तसेच बिस्किट व खाऊ वाटप केले.
मोठे नेत्यांचे, मोठे मोठे फ्लेक्स शहरभर लावले जात असताना, या व्यर्थ खर्चाला फाटा देऊन एक समाजोपयोगी उपक्रम यानिमित्ताने नगरसेविका सारिका बोऱ्हाडे व युवा नेते नितीन बोऱ्हाडे यांच्या वतीने राबविण्यात आला.
यावेळी या अनाथाश्रमातील मुलींच्या चेहऱ्यावर हास्य पाहून समाधान व्यक्त झाले. असे नगरसेविका सारिका बोराडे यांनी आपल्या प्रतिक्रिया देताना सांगितले.
यावेळी नगरसेविका सारिकाताई बो-हाडे, नितिन बो-हाडे, निलमताई हुले उपाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी सहकार आघाडी, पिंपरी चिंचवड शहर, अलकाताई वाघोले, बेबीताई सस्ते, सहदेव बो-हाडे, सतिश जरे, विश्वास जैद आदी मान्यवर उपस्थित होते.