सामाजिक, राजकीय लोकाभिमुख उपक्रमांद्वारे प्रभागात वाढतेय ‘क्रेज’..
देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग बनला ‘भाजपमय’…
पिंपरी (दि. २३ जुलै २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहर आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे अतूट नाते आहे. त्यांच्या दूरदृष्टीमुळे आणि मार्गदर्शनाखाली पिंपरी-चिंचवड शहर विकासाकडे झेप घेताना दिसून येत आहे. शहरातील भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता फडणवीस यांच्या विचाराने घडत आहे. त्यांचा राजकारणातील मुत्सद्दीपणा आणि निर्भिड कार्यप्रणाली यापासून प्रेरणा घेऊन कार्यकर्त्यांना काम करायला बळ मिळतय, असे प्रतिपादन भाजप शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केले.
देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक १ चिखली-मोरेवस्तीत युवा नेते पांडाभाऊ साने व नवदुर्गा सखी मंचच्या संस्थापिका, अध्यक्षा रुपालीताई साने यांच्या वतीने कोरोनायोद्धे आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी, घंटागाडी कर्मचारी यांना पावसापासून बचावासाठी पावसाळी रेनकोटचे वाटप व नवदुर्गा सखी मंचच्या महिला सदस्यांसाठी मोफत छत्री वाटपाचा कार्यक्रम, तसेच वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान त्यांच्या हस्ते पार पडला, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी भाजप शहराध्यक्ष तथा आमदार महेशदादा लांडगे, कामगार नेते सचिन भैय्या लांडगे, युवा नेते पांडाभाऊ साने व नवदुर्गा सखी मंचच्या संस्थापिका, अध्यक्षा रुपालीताई साने, माजी महापौर राहुल जाधव, ‘फ’ प्रभाग समिती अध्यक्ष कुंदन गायकवाड, स्वीकृत नगरसेवक संतोष मोरे, स्वीकृत नगरसेवक दिनेश यादव, वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य आनंदा यादव, युवा नेते जितेंद्र यादव, माजी सरपंच यशवंत अण्णा साने, प्रभागातील आरोग्य निरीक्षक, राजू म्हेत्रे, माणिक म्हेत्रे, तुकाराम जाधव, गणेश बाळा मोरे, अविनाश मोरे, संतोष मोरे, अमोल म्हेत्रे, अनिल धन्ने, विजु म्हेत्रे, हरीष अम्रुतकर, विशाल नेवाळे, दिपक घन, कवीता हिंगे, नगरसेवक सागर हिंगणे, निखील मोरे, श्रीराम जाधव, संदिप गोंजारी, सामाजिक कार्यकर्त्या अलकाताई मोरे, प्रभागातील नागरिक व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
महेश लांडगे पुढे बोलताना म्हणाले, कोरोना योद्ध्यांनी संकट काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य चोखपणे बजावले. त्यांच्या सन्मानासाठी प्रभागात अनोखा उपक्रम राबविला आहे. कोरोना काळातही सामाजिक कार्यकर्ते पांडाभाऊ साने यांनी प्रभागातील नागरिकांना कधीही अंतर दिले नाही. कोरोनाबाधित रुग्णांसाठी मोफत रुग्णवाहिका सेवेचाही नागरिकांना फायदा होतोय. सामाजिक, राजकीय लोकाभिमुख उपक्रमांतून व सामाजिक विकासाच्या ध्यासाने त्यांनी जनसंपर्क मजबूत केला आहे. अशा उपक्रमांनीच प्रभागातील नागरिकांमध्ये त्यांची क्रेज वाढत आहे. रुपालीताईंनी देखील प्रभागात मोठी महिला चळवळ उभी केली आहे. या साने कुटुंबाचे सामाजिक कार्य अफाट व वाखाणण्याजोगे असून इतर प्रभागातील कार्यकर्त्यांनी त्यांचा आदर्श घ्यावा. एक लोकप्रतिनिधी म्हणून मी सदैव त्यांच्या पाठीशी आहे, असे कौतुकही त्यांनी केले.
पांडाभाऊ साने म्हणाले, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी केलेल्या सेवाकार्याच्या आवाहनला साद देत, आमचे नेतृत्व महेशदादांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागातील आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी व वैद्यकीय विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना पावसापासून बचावासाठी पावसाळी रेनकोटचे व जवळपास ५०० छत्रींचे वाटप केले. यावेळी शासनाच्या नियमांचे पालन केले. सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात आली आहे. वेगवेगळ्या स्तरावर प्रभागात जनजागृतीचे काम सुरु आहे. नागरिकांनी भीती न बाळगता आरोग्याची काळजी घेण्याबरोबरच महापालिकेने वारंवार केलेल्या सूचनांनुसार घरी राहून स्वत:बरोबरच इतरांचीही काळजी घ्यावी, असे आवाहनही युवा नेते पांडाभाऊ साने यांनी यावेळी केले.
साने परिवाराच्या वतीने दिगंबर साने, अभिजीत साने, कुलदीप साने, आनंद साने, विक्रांत साने, अजय साने यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.