निखिल उमाकांत दळवी यांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम
आझमभाई पानसरे यांच्या शुभहस्ते होणार उद्घाटन
शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादीचे स्वर्गीय नगरसेवक जावेद शेख यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आकुर्डी परिसरात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत.
विठ्ठल प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष निखिल उमाकांत दळवी यांच्या वतीने आकुर्डी परिसरात वृक्षारोपण, वृक्षरोप वाटप, रक्तदान शिबिर, वय पंचेचाळीस पुढील नागरिकांसाठी मोफत रक्त चाचणी शिबिर तसेच महिलांसाठी मोफत थायराइड चाचणी तर मनपा आकुर्डीत दवाखाना येथे रुग्णांना फळे वाटप असे विविध उपक्रम शनिवार दिनांक 31 जुलै रोजी सकाळी 11 ते 5 या वेळेत राबविण्यात येणार आहे.
सदर उपक्रमा चे उद्घाटन आकुर्डी येथील मनपा उर्दू शाळा, स्वागत हॉटेल समोर, शितळा माता मंदिर मागे येथे ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे यांच्या शुभहस्ते होणार आहे/
सदर कार्यक्रमाचे संयोजक शादाब खान, अभिजीत पिसाळ, मुजु खान, विराज कुटे,, दिनेश पटेल, पंकज दळवी,सुयोग काळभोर हे असून आयोजक निखिल उमाकांत दळवी यांनी आकुर्डी परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमात सहभाग घेऊन लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे