शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पिंपरी-चिंचवड शहरातील दिघी परिसरात महायज्ञ रक्तदान शिबिराचे आयोजन संतोष तानाजी वाळके यांनी केले आहे.
शिवसेनेच्या दिघी शाखा व कै. तानाजी सोपानराव वाळके, कै,सुजाता एकनाथ वाळके प्रतिष्ठान च्या संयुक्त विद्यमाने सदर रक्तदान शिबिर संपन्न होणार आहे, या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान करण्यासाठी नाव नोंदणी करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे तसेच नाश्त्याची व जेवणाची व्यवस्था ही यावेळी करण्यात येणार आहे, पावसाळा सुरू असल्याने रक्तदात्यांची साठी रिक्षाची ही व्यवस्था करण्यात आलेली आहे , प्रत्येक रक्तदात्यांना एक भेटवस्तू म्हणून देण्यात येणार आहे तसेच लकी ड्रॉ द्वारे रक्तदात्यांना ज्यांचे नाव येईल त्यांना टीव्ही, फ्रीज ,मिक्स,र टेबल फॅन ,मायक्रोन सारख्या भेटवस्तूही मिळणार आहेत.
सदर रक्तदान शिबिर छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, कोकण मराठा संघ काटे वस्ती ,दिघी, पुणे येथे गुरुवार दिनांक 29 जुलै रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या दरम्यान होणार आहे तरी दिघी परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या रक्तदान शिबिरात सहभाग घ्यावा असे आवाहन आयोजक संतोष तानाजी वाळके यांच्या वतीने करण्यात आले आहे