शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड शहरातील राही – माई प्रतिष्ठान व जे डी ग्रुप वतीने प्रभाग क्रमांक 32 मधील इयत्ता दहावी मध्ये 65 टक्के पेक्षा जास्त गुण संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
Advertisement
शैक्षणिक वर्ष २०२०- २१ मध्ये ज्या विद्यार्थ्यांना इयत्ता दहावी मध्ये 65 टक्के पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत अशा विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात येणार आहे पात्र विद्यार्थ्यांनी आपली गुणपत्रिकेची प्रत आणि आपला मोबाईल नंबर पिंपरी चिंचवड शहराच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे यांचे संपर्क कार्यालय सांगवी गावठाण , प्रियदर्शनी नगर, मल्हार गार्डन , नवी सांगवी, पिंपरी चिंचवड , पुणे 61 येथे जमा करावे असे आवाहन जेडी ग्रुपचे संस्थापक व संयोजक जवाहर ढोरे यांनी केले आहे.
Advertisement