शबनम न्यूज | पिंपरी
दापोडी | बातमीदार
शिवसेनाप्रमुख ,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त माझा मुख्यमंत्री सप्ताह आयोजित करण्यात आला आहे सदर उपक्रमाचे आयोजन पिंपरी विधानसभा युवासेना अधिकारी नीलेश एकनाथ हाके यांच्या वतीने राबविण्यात येत आहे.
या उपक्रमांतर्गत प्रभाग क्रमांक तीस मधील रिक्षाचालकांसाठी रिक्षा सेफ्टी कव्हर देण्यात येणार आहे हा कार्यक्रम सोमवार दिनांक 26 जुलै रोजी सकाळी अकरा वाजता बाळासाहेब ठाकरे वाचनालय, गणेश नगर, दापोडी येथे आयोजित करण्यात आला आहे.
या उपक्रमात सहभाग घेण्यासाठी रिक्षाचालकांनी आपली नाव नोंदणी करणे आवश्यक आहे या नोंदणीकरिता रिक्षा परमिट, आधार कार्ड, व मतदान कार्ड आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे तरी जास्तीत जास्त रिक्षाचालकांनी या उपक्रमात सहभाग घ्यावा असे आवाहन निलेश हाके यांनी केले आहे.
याकरिता नाव नोंदणीसाठी संपर्क करण्याचे आवाहनही केले आहे अविनाश जाधव – 98 60 70 10 02 व प्रमोद गायकवाड – 88 88 28 28 10 या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा असेही सांगण्यात आले आहे