शबनम न्युज | मावळ
देहू | प्रतिनिधी
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मावळ विधानसभा मतदार संघाचे आमदार सुनिल आण्णा शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर आणि तालुका अध्यक्ष बबनराव भेगडे यांच्या सूचनेनुसार व देहू शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष प्रकाश हगवणे यांच्या अध्यक्षतेखाली आणि युवा नेते अमित घेनंद यांच्या संकल्पनेतून साकार झालेले ‘राष्ट्रवादी आपल्या दारी’ अभियानाला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
अमित घेनंद यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले कि, आज सातव्या दिवशी अभियान यशस्वी झाले. विशेष म्हणजे माझ्या प्रभागातील अनेक वर्षे प्रलंबित समस्या जाणून घेतल्या देहु मधील उर्वरित समस्या जाणून घेतल्या. प्रत्येक भागात जाऊन पक्षाचा प्रचार प्रसार केला. येणाऱ्या निवडणूकीत याचा पक्षाला फायदा होईल. असा विश्वास आहे. आणि नागरिकांनी देखील या उपक्रमाचे स्वागत केले. आणि विश्वास व्यक्त केला.कारण आज पर्यंत कधीच असा उपक्रम देहूत झाला नव्हता. देहू भागातील १० वर्षे प्रलंबित असलेल्या अंतर्गत रस्त्याचे कामे प्रगतीपथावर आहे व उर्वरित समस्या जाणून घेतल्या व लवकरच आमदार साहेबांच्या माध्यमातून त्या सोडविल्या जातील .
यावेळी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश हगवणे, महाराष्ट्र प्रदेश कामगार सेल उपाध्यक्ष योगेश जाधव, मा.सरपंच कांतीलाल तात्या काळोखे,सुनिल कडूसकर,सरचिटणीस शैलेश चव्हाण,प्रभाग अध्यक्ष चंदूभाऊ भोसले, माणिक मामा जाधव, सोशल मिडिया अध्यक्ष अमित घेनंद,उद्योजक संदीप भाऊ गाडे,विक्रम पाटील,संदीप देसाई,विजू सुतार,संदीप गार्डे,विजू फिरके,अतुल गिरी,प्रशांत बेंडभर, लखन मदने,ऋषिकेश चव्हाण,अजय घायाळ,विवेक चव्हाण,अमोल राठोड व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि देहू मधील सोसायटी मधील नागरिक व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.