शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
भोसरी | बातमीदार
महाराष्ट्रात पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी अनेक राजकीय नेते सामाजिक संघटना पुढे येत असताना शिवसेनेच्या माजी नगरसेविका पुणे जिल्हा संघटिका सुलभाताई उबाळे यांच्या वतीने ही एक हात मदतीचा एक हात माणुसकीचा यानुसार चिपळूण, रत्नागिरी, महाड या भागातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.
शहरातील दानशूर व्यक्तींनी पूरग्रस्तांसाठी वस्तू स्वरूपात मदत करावी ब्लॅंकेट, धान्य ,घरगुती साहित्य, पिण्याचे पाणी, ब्लिचिंग पावडर, जनावरांसाठी खाद्य पदार्थ ,औषधे, अँटीसेफ्टीक साबण, सनिट्झर मास्क या वस्तूंची मदत करण्याचे आवाहन सुलभाताई उबाळे यांनी केले आहे.
मदत करण्यासाठी त्यांचे संपर्क कार्यालय येथे संपर्क साधावे. तसेच 99 70 99 00 08 व त्यात तर 73 87 99 13 60 या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा असे ही सांगण्यात आले आहे