शबनम न्यूज | पिंपरी
पिंपरी | प्रतिनिधी
रूम मध्ये ठेवलेला लॅपटॉप आणि लॅपटॉपची बॅग चोरून नेण्याचा प्रकार 16 जुलै सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान आकुर्डी रेल्वे स्टेशनच्या जवळ वाल्हेकरवाडी येथे घडला.
Advertisement
या प्रकरणी प्रवीण पुंडलिक सोनवणे (वय 26 ) रा. वाल्हेकरवाडी चिंचवड यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे अर्पित खन्ना यांच्या रूम मध्ये राहतात. 16 जुलै रोजी त्यांच्या घरातून कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या लॅपटॉप, बॅग, माउस, चार्जर असा 29 हजार शंभर रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला.
Advertisement