शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
पिंपरी | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरातील सौ माधुरी वाघमारे ( तुरुकमारे) यांचा महाराष्ट्र पोलीस ते महाराष्ट्र सुपरमॉडेल या यशस्वी प्रवासाला पिंपरी-चिंचवड शहराच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
Advertisement
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत सौ माधुरी वाघमारे ( तुरुकमारे) यांचा महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते नुकताच सन्मान करण्यात आला.
सौ माधुरी वाघमारे ( तुरुकमारे) यांनी महाराष्ट्र सुपरमॉडेल 2021 चे प्रथम विजेतेपद पटकावले आहे. त्यांनी मिळवलेले यश हे पिंपरी-चिंचवड शहराचे यश असल्याचे यावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी सांगितले. व सौ माधुरी वाघमारे ( तुरुकमारे) यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Advertisement