शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
रावेत | प्रतिनिधी
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरात विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरातील युवा सेनाचे दिपक शरद भोंडवे यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन शिंदे वस्ती रावेत येथे करण्यात आले.
या रक्तदान शिबिरास रक्तदात्यांचा प्रचंड प्रतिसाद पहावयास मिळाला यावेळी एकूण 105 जणांनी आपले रक्तदान केले या रक्तदान शिबिरास पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील शिवसेनेचे नगरसेवक राहुल कलाटे, माजी नगरसेवक अनंत कोऱ्हाळे , बाळासाहेब वाल्हेकर , पोलीस निरीक्षक अर्जुन पवार .,पोलीस उपनिरीक्षक रमेश जाधव , दिलीप भोंडवे विशाल दांगट ,राजेंद्र तरस आदी जणांनी भेट दिली या रक्तदान शिबिरात युवक, महिला व पुरुष यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला व शिबिर यशस्वी पार पडले या प्रसंगी नवनाथ भोंडवे ,अनिल भोंडवे ,बाळासाहेब भोंडवे ,शरद भोंडवे ,लहू ठाकूर ,राहुल भोंडवे दत्तात्रय भोंडवे , गणेश मित्र मंडळ व संजीवनी ब्लड बँक तसेच सर्व शिवसैनिक व युवासैनिक यांचे सहकार्य लागले.