शबनम न्यूज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड मनपाच्या सेक्टर क्रमांक २३ जलशुद्धीकरण केंद्र पासून ते डांगे चौकापर्यंत जाणाऱ्या साडेसात किलोमीटरच्या एक हजार मिलिमीटर व्यासाच्या पाण्याच्या लाईनचे काम वाल्हेकरवाडी येथील शेतकरी वाल्हेकर व इतरानी मनपा सोबत जमीन मोबदल्याकरिता अडवले होते.अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले हे काम आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांनी प्रत्यक्ष जागेवर पाहणी करून सदर शेतकऱ्याना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या भूसंपादनाबाबतचा व शेतकऱ्यांच्या समस्याचा विषय मार्गी लावून तातडीने काम करण्याचे आदेश महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या श्रीयुत लडकत व इतर अधिकाऱ्यांना दिले.
हि बातमी पण वाचा : Pune : जे जोशी ग्रुपचे इन्व्हेस्टर्स क्लिनिक (आयसी) सह सामंजस्य करार
अनेक वर्षापासून उद्योगनगरी पिंपरी-चिंचवड क्षेत्रातील पिंपळे सौदागर ते वाकड परिसरात अनियमितपणे व कमी दाबाने होणारा पाणीपुरवठाचा प्रश्न मार्गी लागला आहे पाणीपुरवठ्याच्या वाहिनीचे उर्वरित काम युद्धपातळीवर करून पाण्याची लाईन चार्ज करून सदर परिसरातील नागरिका ना पुरेशा दाबाने पाणी उपलब्ध येत्या १५ ऑगस्ट स्वातंत्रदिनाच्या पूर्वसंध्ये पूर्वी सुरळीत करून देण्याचे ग्वाही दिली माननीय आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या समक्ष जागेवर जाऊन शेतकरी,मनपा प्रशासन,पाणीपुरवठा विभाग व काम करणाऱ्या यंत्राने ची योग्य ती सांगड घालून काम सुरू करून दिल्याने पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपळे सौदागर व वाकड परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.