शबनम न्युज :प्रतिनिधी
स्वदेशीकरणाने सक्षमीकरण शक्य:सैन्यदल प्रमुख मनोज पांडे
स्वदेशी आणि सर्वंकष शस्त्रात्रे हे उद्दिष्ट:नौसेना प्रमुख अॅडमिरल आर.हरी कुमार
३ लाखापेक्षा अधिक विद्यार्थी,नागरिकांची प्रदर्शनाला भेट
मोशी , पुणे : ‘सामर्थ्यशाली भारतीय सैन्यदलाच्या शस्त्रसामग्री निर्मितीचे प्रतिबिंब असलेल्या ‘महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो –२०२४’ मधे शेवटच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे दि.२६ फेब्रुवारी रोजी विदयार्थी , नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.तीन दिवसात एकूण ३ लाखाहून अधिक विद्यार्थी,नागरिकांनी भेट देऊन लष्करी शस्त्र सामग्री आणि तंत्रज्ञान प्रणालींची माहिती करून घेतली.प्रदर्शनात तिन्ही भा
सैन्यदल प्रमुख मनोज पांडे म्हणाले,’या प्रदर्शनात येणे आनंदाचा क्षण आहे.नाविन्यता,गुणवत्ता याला आम्ही प्राधान्य देत आहोत.एमएसएमई क्षेत्राबरोबर स्वदेशी शास्त्रात्रं निर्मिती साठी करार केले जात आहे.नव्या तंत्रज्ञानाचे स्वागतच केले जाणार आहे.या सर्व तंत्राचे पेटंट घेतले जातील.एमएसएमई क्षेत्राला परदेशातून येणाऱ्या मिलिटरी शिष्ट मंडळाला भेटून प्रगतीची संधी दिली जात आहे.वापरकर्त्याच्या गरजा समजून घेतल्याने या क्षेत्राची प्रगती होणार आहे.आर्मी डिझाईन ब्युरो आणि अन्य लष्करी संस्था देखील योगदान देत आहे.या निमित्ताने डिफेन्स इकोसिस्टिम तयार होत आहे.त्यामुळे आत्मनिर्भरतेला वाव मिळेल.स्वदेशीकरणाने सक्षमीकरण शक्य होणार आहे.उगवत्या भारताच्या प्रगतीत योगदान देण्यासाठी आपण सज्ज झाले पाहिजे.मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे,’निबे लिमिटेड’ चे अध्यक्ष गणेश निबे यांनी स्वागत केले.३ लाखापेक्षा अधिक विद्यार्थी,नागरिकांनी प्रदर्शनाला भेट देणे हा विक्रम असल्याचे धवसे यांनी सांगितले.
नौसेना प्रमुख ऍडमिरल आर.हरी कुमार म्हणाले,’भविष्यात काय होईल हे आपल्याला माहित नसते.अनिश्चितता नेहमीच असते.त्यामुळे या संरक्षण क्षेत्रात जबाबदाऱ्यांचा कस लागतो.त्यात सुरक्षिततेसाठी तंत्रज्ञानाचा उपयोग होतो.भारताच्या सर्व सागरी सीमा सुरक्षित आहेत.फक्त तंत्र महत्वाचे नसते,तर ते कसे वापरले जाते,हेही महत्वाचे असते.म्हणून आपण सर्वानी एकत्र येऊन काम केले पाहिजे.स्वदेशी आणि सर्वंकष शस्त्रात्रे ,तंत्र हे उद्दिष्ट आहे.धोरणात्मक स्वायतत्ता मिळविण्यासाठी कार्य केले पाहिजे.प्रत्येक गोष्ट भारतात तयार होण्यासाठी काम केले पाहिजे .एक विकसित देश म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी योगदान दिले पाहिजे.
एमआयडीसी चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विपीन शर्मा,’निबे लिमिटेड’ चे अध्यक्ष गणेश निबे यांनी ऍडमिरल आर.हरी कुमार यांचे स्वागत केले.नौसेना प्रमुख ऍडमिरल आर.हरी कुमार यांच्या हस्ते प्रदर्शनाच्या स्ट्रॅटेजिक पार्टनर कंपन्यांचे प्रतिनिधी अनिल कुलकर्णी,आदित्य वागळे,मयंक तिवारी,अजय शर्मा तसेच कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे यांचा सत्कार करण्यात आला.किशोर धारिया यांनी आभार मानले.
हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी यांनी दि .२४ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रदर्शनाला भेट देत भारत सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ उद्दिष्टाच्या अनुषंगाने, भारतीय वायुदलाच्या स्वावलंबी बनण्याच्या भविष्यातील गरजेची जाणीव निर्माण करण्यासाठी सहभागी उद्योगांशी संवाद साधला.
तिसऱ्या शेवटच्या दिवशी म्हणजे २६ फेब्रुवारी रोजी चर्चासत्रे,प्रेरक मार्गदर्शन,दालनांना भेटी आणि मिलिटरी बँड, एअर फोर्स बँड, नेव्ही बँडचे सादरीकरण असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले .या महाप्रदर्शनाच्या संयोजकांच्या वतीने तसेच प्रदर्शनाचे नॉलेज पार्टनर असलेल्या निबे लिमिटेड या कंपनीच्या वतीने अध्यक्ष गणेश निबे यांनी ही माहिती दिली.सैन्यदलासाठी निर्माण केलेली अत्याधुनिक शस्त्रात्रे,तंत्रज्ञान,प्रणाली या दालनांमधून मांडण्यात आली .प्रदर्शनाला येणाऱ्या सर्वांना त्याची माहिती देण्यात येत आहे.नागरिकांचा उत्साही प्रतिसाद लाभला आहे.
*बलसागर भारत होवो:गणेश निबे यांची भावना*
‘आम्ही सर्वानी प्रचंड मेहनत केली आणि सर्वानी सहकार्य केले त्यामुळे आणि प्रदर्शनातील वैविध्यामुळे बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो ही भावना प्रत्यक्षात आली . सैन्याला सदैव पुढे नेणारे ,विक्रमांचा उच्चांक करणारे प्रदर्शन अशी या प्रदर्शनाची नोंद झाली ‘,असे निबे लिमिटेड चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक गणेश निबे यांनी सांगितले. ‘निबे लिमिटेड‘ ही कंपनी ‘महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो २०२४’ ची नॉलेज पार्टनर होते. एल अँड टी,सोलर ग्रुप,टाटा ऍडव्हान्स्ड सिस्टिम्स ,भारत फोर्ज लिमिटेड हे स्ट्रॅटेजिक पार्टनर असून उद्योग विभाग महाराष्ट्रच्या वतीने डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन(डीआरडीओ) च्या सहकार्याने हे महाप्रदर्शन आयोजित करण्यात आले .
*चर्चासत्रे,प्रेरक मार्गदर्शन,दालनांना भेटी आणि नेव्ही,एअर फोर्स बँड चे सादरीकरण*
दि.२६ फेब्रुवारी रोजी सकाळी साडे आठ वाजता नेव्ही बँड चे सादरीकरण झाले.साडे नऊ ते पावणे दहा वाजता इंडियन नेव्ही विषयी सादरीकरण करण्यात आले .सव्वा दहा वाजता एम एस एम ई धोरणाविषयी विद्यार्थ्याना सैन्य दल प्रमुख जनरल मनोज पांडे यांनी मार्गदर्शन केले. नंतर जनरल मनोज पांडे, लेफ्टनंट जनरल जे.बी.चौधरी यांनी विविध दालनांना भेटी दिल्या . साडेअकरा वाजता लेफ्टनंट जनरल सी.एस.मान यांनी उपस्थितांशी संवाद साधला. १२ वाजता कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे , दीड वाजता व्हाईस अॅडमिरल एस.व्ही. भोकरे, पावणेदोन वाजता लेफ्टनंट जनरल अदोश कुमार, अडीच वाजता अनील यादव, ३ वाजता जसबीर सिंह सोळंकी, सव्वा तीन वाजता ब्रिगेडियर विकास, साडेतीन वाजता रवी सिन्हा, पावणेचार वाजता मनदीप सिंग, ४ वाजता धनंजय सोनवणे, सव्वाचार वाजता रमेश भाटिया, साडेचार वाजता राहुल पांगरे यांनी मार्गदर्शन केले. साडेबारा वाजता आर्मी बँडचे, पावणेपाच वाजता एअरफोर्स बँडचे सादरीकरण झाले. सायंकाळी पाच वाजता महाप्रदर्शनाच्या समारोपाचा कार्यक्रम पार पडला.
Advertisement