शबनम न्यूज | पिंपरी
पिंपरी | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरातील वायसीएम रुग्णालयातील 217 कंत्राटी कर्मचाऱ्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिका एक ऑगस्टपासून कामावरून कमी करणार आहे, हे कर्मचारी कोरोना काळात आपल्या जिवाची पर्वा न करता रुग्णांची सेवा करीत होते त्यांना कायमस्वरूपी कामावर घ्यावे असे केंद्र व राज्य सरकारचे आदेश असताना महापालिका प्रशासन कोणतीही पूर्वकल्पना न देता या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणार आहेत या निर्णयाला तातडीने रद्द करावे या कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा अन्यथा आंदोलनाला सामोरे जावे लागेल असा इशारा राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिला.
हि बातमी पण वाचा : Pimpri : शिवसेनेचे युवा नेते आकाश चतुर्वेदी यांच्यावतीने कोल्हापूरच्या पूरग्रस्तांना मदत
याबाबत यशवंत भोसले यांनी म्हटले की पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर कामगारांची आपण बाजू मांडली त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली नव्या कंत्राटाला स्थगिती देण्याची मागणी केली त्यावर आयुक्त राजेश पाटील यांनी सकारात्मक निर्णय घेतले जातील असे आश्वासनही दिले आहे,
यशवंत भोसले यांनी पुढे सांगितले की महापालिकेच्या वायसीएम रूग्णालयातील कॉरिडॉर ,अंतर्गत बाह्य परिसरातील ,रस्ते ,गार्डन, ड्रेनेज लाइन ची साफसफाई तसेच रुग्णांची सेवा, नर्सेस , डॉक्टर ना मदत आदी कामे 217 कर्मचारी मार्फत केली जातात कोरोना महामारी काळात या कर्मचाऱ्यांनी आपले काम प्रामाणिकपणे केले त्यांनी कोरोना बाधित रुग्णांची सेवा केली अश्या कोरोना योद्ध्यांना सन्मानित करण्या ऐवजी त्यांना कामावरून कमी करण्याची कारवाई करण्यात येत आहे या कामगारांना न्याय द्यावा अन्यथा आपण मोठ्या प्रमाणावर आंदोलन करणार असल्याचे यशवंत भोसले यांनी सांगितले