शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक 26 पिंपळे निलख येथील विनापरवाना वृक्षतोड केल्याने ठेकेदार आणि स्थापत्य विभाग अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रयत विद्यार्थी परिषद सचिव,रविराज काळे यांनी पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील यांना निवेदनाद्वारे केली आहे.
हि बातमी पण वाचा - Mumbai : डॉ. दिपक म्हैसेकर लिखित कोविड मुक्तीचा मार्ग पुस्तकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन
दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, पिंपरी चिंचवड पालिका अधिकारी ज्यु.इंजि. कदम मॅडम ( ड प्रभाग स्थापत्य )आणि सदर ठेकेदार में. A.G.Associat मार्फत प्रभाग क्रमांक 26 पिंपळे निलख येथील स्व. कै. प्रभाकर साठे उद्यान समोरील रस्त्यावरील कॅशिया प्रजातिचे झाड विनापरवाना तोडण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये महा ( नागरी श्रेत्र )झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम अंमलात असून सदर कार्यक्षेत्रातील कोणत्याही वृक्षाचा विस्तार कमी करणे / वृक्षतोड करणे / वृक्ष पुर्नरोपण करणे अगोदर उद्यान वृक्ष संवर्धन विभागाची परवानगी घेणे आवश्यक होते. परंतु ज्यु.इजि. कदम मॅडम (ड प्रभाग स्थापत्य) आणि संबंधित ठेकेदार हे A.G.Associat यांनी प्रभाग क्रमांक 26 मधील स्मार्ट सिटी अंतर्गत रस्त्याच्या मधील कॅशिया प्रजातिचे झाड स्थापत्य विभागा मार्फत जे.सी.बी च्या सहाय्याने पुर्णपणे काढले आहे. स्मार्टसिटीच्या कामामध्ये स्मार्ट पद्धतीने वृक्षतोडीचे प्रमाण अधिक असल्याचे निदर्शनास येते. स्मार्ट सिटी चे काम चालू आहे कि स्मार्ट वृक्षतोडीचे काम चालू आहे याबाबत आयुक्त साहेबांनी खुलासा करावा संदर्भ क्र 2 नुसार उद्यान विभागाने 13 जुलै 2021 रोजी ड प्रभाग स्थापत्य विभागास कारणे दाखवा नोटीस देऊनही अद्यापही कार्यवाही न झाल्यामुळे स्थापत्य विभाग संबंधितांना पाठीशी घालण्याचे काम करत आहे.संदर्भ क्र 1 नुसार झाड विनापरवाना तोडल्याचे पंचनाम्यात नमूद आहे तरीही कारवाईस विलंब होत असल्यामुळे मा.आयुक्त साहेब आपणाकडे मागणी करत आहोत की संबंधितांवर कठोरात कठोर कारवाई करावी. असे हि रविराज काळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे.