जेष्ठ नेते आझमभाई पानसरे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन
शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
आकुर्डी | प्रतिनिधी
स्वर्गीय नगरसेवक जावेद रमजान शेख यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित विठ्ठल प्रतिष्ठाण आकुर्डी अध्यक्ष निखिल दळवी यांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.
* आकुर्डी परिसरात वृक्षरोपण
* वृक्ष रोप वाटप
* रक्तदान शिबिर (करोना लस घेतल्या नंतर १५ दिवसांनी रक्तदान करता येईल रक्तदान करण्यास कोणताही धोका नाही )
* वय वर्ष ४५ पुढील नागरिकांन साठी मोफत रक्त चाचणी ( हीमोग्लोबिन शुगर )
* महिलांसाठी मोफत थाईरोड चाचणी ( टेस्ट )
* मनपा आकुर्डि दवाखाना येथे रुग्णाना फळे वाटप
हि बातमी पण वाचा : PIMPRI : नगरसेविका सुवर्णा विकास बुर्डे यांच्या वाढदिवस निमित्त विविध सामाजिक उपक्रम
वरील सर्व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,या कार्यक्रमाचे उदघाटन मा. आझमभाई पानसरे(ज्येष्ठ नेते, पिं. चिं. शहर) यांच्या हस्ते करण्यात आले तसेच संजोग वाघेरे,शहराध्यक्ष रष्ट्रवादी कोंग्रेस वैशाली काळभोर,महिला अध्यक्ष राष्ट्रवादी कोंग्रेस फेहमीदा जावेद शेख, मुमताज़ इनामदार किशोर गाथाडे, नगरसेवक राजू बनसोडे,मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले, माजी नगरसेवक सर्यकांत दळवी माजी नगरसेवक विजय बोऱ्हाडे, माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस शहराध्यक्ष यश दत्ता काका साने, प्रकाश परदेशी भीमराव बनसोडे, बाळासाहेब बरगले अखिलेश सिंग, निलेश शिंदे, रणजित औटी, संजय जगताप, केदार वायाळ, रोहिदास शिवणेकर, डॉ. सुनीता साळवे वैद्यकिय अधिकारी व बोरकर सर योगेश मोरे वेदांत माळी अमोल पाटील सतीश शीलम राम शीलम वाहिद पटेल वैद्यकिय अधिकारी सारिका ढमे, मेधा पळशीकर, लता सोनावणे वैशाली गायकवाड हे सर्व मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विराज कुटे यांनी केले. तसेच संयोजन मुज्जु खान दिनेश पटेल, अभिजित पिसाळ पंकज दळवी, अल्ताफ शेख, शादाब खान, मयूर थोरवे, यांनी केले.