शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
साई शारदा महिला महासंघ व माणदेशी फाउंडेशन यांच्या वतीने गुरुवार दिनांक 5 ऑगस्ट रोजी संभाजीनगर मधील महिलांना, पक्षी तज्ञ, टेरेस व बालकनी गार्डनचे प्रशिक्षक श्री नंदू कुलकर्णी सर यांनी टेरेस व बालकनी गार्डनचे प्रशिक्षण दिले.
तसेच माणदेशी फाउंडेशनच्या सौ.धनश्री लोले, सौ.रजनी गिरी व सौ.रेखा पवार यांच्या वतीने घरातल्या ओल्या कचऱ्या पासून खत बनवणे, घरातील टेरेस व बालकणी येथे दहा प्रकारचे भाजीपाला उगवणे याचे प्रशिक्षण दिले. सदर कार्यक्रमास उस्फुर्त प्रतिसाद मिळाला, 150 महिलांनी यामध्ये सहभाग नोंदविला.
सदर कार्यक्रमाचे आयोजन ज्येष्ठा नगरसदस्या व मा.महापौर मंगलाताई कदम व कुशाग्र कदम युथ फाउंडेशन पिंपरी चिंचवड यांच्या वतीने आयोजित करण्यात आले.
Advertisement