शबनम न्यूज |पिंपरी चिंचवड
पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादी युवक कांग्रेस पक्षाचे पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष निखिल दळवी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पिंपरी शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला.
राजीनामा मध्ये त्यांनी आपल्या वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष पदी काम करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी पक्षाचे आभार ही मानले.
तसेच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्य पदाचा ही राजीनामा दिला आहे.
महानगरपालिकेची निवडणूक येत्या काही महिन्यांवर आली आहे या पार्श्वभूमीवर निखिल दळवी यांनी राजीनामा दिल्याने त्यांच्या राजीनाम्याची सर्वत्र चर्चा होत आहे.
निखील दळवी यांनी राष्ट्रवादी युवक कांग्रेस च्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले तसेच आकुर्डी व शहर परिसरात यांनी कोरोना काळात उत्तमोत्तम कामगिरी केली.
नुकतेच स्वर्गीय नगरसेवक जावेद शेख यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त यांनी भव्य रक्तदान शिबिर वृक्षारोपण कार्यक्रम असे उपक्रम राबविले.
परंतु तू आता त्यांनी आपल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहर उपाध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.