शबनम न्युज | पुणे
पुणे | प्रतिनिधी
पुणे विभागातील 18 लाख 703 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 18 लाख 74 हजार 203 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 34 हजार 863 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 38 हजार 637 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.06 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 96.08 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 10 लाख 91 हजार 690 रुग्णांपैकी 10 लाख 64 हजार 509 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 8 हजार 878 आहे. कोरोनाबाधित एकूण 18 हजार 303 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.68 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 97.51 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 24 हजार 34 रुग्णांपैकी 2 लाख 9 हजार 579 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 9 हजार 22 आहे. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 433 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 80 हजार 713 रुग्णांपैकी 1 लाख 71 हजार 591 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 4 हजार 511 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 611 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 80 हजार 76 रुग्णांपैकी 1 लाख 68 हजार 469 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 6 हजार 867 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 740 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 97 हजार 690 रुग्णांपैकी 1 लाख 86 हजार 555 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 5 हजार 585 आहे. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 550 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 3 हजार 601 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 913, सातारा जिल्ह्यात 909, सोलापूर जिल्ह्यात 563, सांगली जिल्ह्यात 764 तर कोल्हापूर जिल्ह्यात 452 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 3 हजार 156 आहे. पुणे जिल्हयामध्ये 1 हजार 33, सातारा जिल्हयामध्ये 215, सोलापूर जिल्हयामध्ये 588, सांगली जिल्हयामध्ये 784 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 536 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 कोटी 33 लाख 93 हजार 418 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 18 लाख 74 हजार 203 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.