कोरोना काळातही केली अनेकांना मदत
शबनम न्यूज | पिंपरी
महाराष्ट्रात अति पावसामुळे पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली कोल्हापूर, सांगली, कराड, कोकण भागात पुरामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले अनेकांचे अतोनात नुकसान झाले, संपूर्ण महाराष्ट्रातून या पूरग्रस्तांना मदतीचा ओघ सुरू झाला , सर्व स्तरातून पूरग्रस्तांसाठी मदत पाठविण्यात आली याच पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भोसरी विधानसभेच्या उपाध्यक्ष सौ सारिका युवराज ढमे यांच्यावतीने ही पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तू व अन्नधान्यांची मदत करण्यात आली.
कोल्हापूर, सातारा, सांगली, कोकण या भागात पुरामुळे नुकसान झालेल्या बांधवांसाठी एक मदतीचा हात म्हणून किराणामाल, हरभरा डाळ ,उडीद डाळ, तांदूळ ,चहा पावडर ,कपडे धुण्याची साबण ,आंघोळीची साबण ,टूथपेस्ट, पिण्याच्या पाण्याचे बॉटल ,कपडे इत्यादी साहित्य मदत म्हणून पाठविण्यात आले.
यावेळी आपल्या प्रतिक्रिया देताना सारीका ढोमे यांनी सांगितले की , निसर्ग हा दाता असला तरी आज पाहिलं तर निसर्गाच्या संकटाचा सामना आज मानव जातीला करावा लागत आहे. आजपर्यंतच्या पर्जन्यमानाच्या इतिहासात अतिरेकी पाऊस आला.कोल्हापूर, सांगली, कराड, कोकण भागाला महापूराचा वेढा पडला.होत्याचे नव्हते झाले. अनेक संसार पुरात वाहून गेले. शेती ,पशुधनाचे अतोनात नुकसान झाले.एक सामाजिक बांधिलकी या नात्याने आपण पूरग्रस्त नाही जीवनावश्यक वस्तूंची मदत पाठवीत आहे पिंपरी-चिंचवड शहरातील दानशूर व्यक्तींनी ही पूरग्रस्तांना मदत करावी असेही आव्हान सारिका युवराज ढमे यांनी केले.
कोरोना काळात हि सारिका युवराज ढमे यांनी केली अनेकांना मदत
महाराष्ट्र हा सध्या मागील दोन वर्षापासून कोरोना काळ व लॉक डाऊन चा सामना करीत आहे लॉक डाउन काळातही सारिका युवराज ढमे यांनी गरजवंतांना अनेक प्रकारे मदत केली आहे ,ज्या कुटुंबाचे लॉक डाऊन मुळे व्यवसाय बंद झाले ,नोकऱ्या गेल्या अशा कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू व दोन वेळचे जेवण या काळात सारिका युवराज ढमे यांनी दिले तसेच कोरोना काळात रुग्णांना बेड उपलब्ध होत नव्हते यावेळेसही बेड उपलब्ध करून देण्याचे काम सारिका ढमे यांनी केले आहे. या काळात अनेक रुग्णांना ऑक्सिजन तुटवड्यामुळे संकटांचा सामना करावा लागत होता अशा रुग्णांनाही ऑक्सीजन उपलब्ध करून देण्याकरिता प्रयत्न केले तसेच प्लाजमा दात्यांना प्रोत्साहित करून प्लाझ्मा दान करण्यास मार्गदर्शन केले या कोरोना च्या संकटमय काळामध्ये रेमडीसीवीर इंजेक्शनचा तुटवडा भासत होता अशा रुग्णांना ही इंजेक्शन मिळवून देण्याकरिता सारिका युवराज ढमे या प्रयत्न करत होत्या याकाळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या यांनाही स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी तसेच नोकरी मिळवून देण्यासाठी ही सारिका ढमे यांनी प्रयत्न केले आहे.