शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
शिवशाही व्यापारी संघ पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सचिन आण्णा लिमकर यांच्या बैठकीत शिवशाही व्यापारी संघ अल्पसंख्याक आघाडी पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष पदी सामाजिक कार्यकर्ते व अभ्यासू व्यक्तिमत्व जहांगीर रहेमान शेख यांची निवड करण्यात आली आहे .
यावेळी त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात नियुक्तीपत्र व सन्मान करण्यात आला . नियुक्ती झाल्यानंतर जहांगीर शेख यांनी आपल्या सामाजिक कार्याची सुरुवात आज पिंपरी येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आपल्या सामाजिक कार्याची सुरुवात केली आहे.
यावेळी अध्यक्षाने त्यांच्या पुढील वाटचालीस आपल्या हातून पिंपरी-चिंचवड शहरातील अल्पसंख्यांक आघाडी, व्यापारी वर्ग, मुस्लीम बांधव, खाटीक बांधव यांच्यासह सर्व माता भगिनींची सेवा कटिबद्ध पणे करावी अशा शुभेच्छा देण्यात आल्या. त्यावेळी पुढील प्रमाणे प्रमुख बहुजन वचिंत आघाडीचे अभिजित मोटे शिवशाही व्यापारी संघ उपअध्यक्ष महाराष्ट्र राज्य काकासाहेब कुलकर्णी, राहुल शिर्के, खंडू शेठ मोरे, सोशल मिडिया प्रमुख शुभम बिरादार, सागर पवार, नवनाथ मामा कोकणे, गणेश भाऊ खरात, समीर शेख, रोहन गायकवाड, रूक्षी नळगे, कमल शेख, नदीम शहा इत्यादी मान्यवर उपस्थित होते.