शबनम न्युज | पुणे
Advertisement
पुणे | प्रतिनिधी
पुण्यातील नळ स्टॉप याठिकाणी प्रभाग क्रमांक १३ येथे टाटा टेलि सर्व्हिसेसच्या वतीने सनलाईट नेटवर्क कंपनीमध्ये कार्यरत असलेले कंत्राटदार देवा राठोड व त्यांच्या कामगारांनी केबल टाकण्यासाठी नळ स्टॉप याठिकाणी पुणे महानगरपालिके ची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे १७० मीटरची खोदाई केली आहे.
Advertisement
Advertisement
सदरील कंपनीने पुणे महानगरपालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करून या कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात यावे आणि महानगरपालिकेचे झालेले नुकसान दंडासह भरून घ्यावे. अशी मागणी सनी निम्हण यांनी पत्रकाद्वारे मुख्य अभियंता पथ विभाग पुणे महानगरपालिका पुणे यांच्याकडे केली आहे.
Advertisement
Advertisement