शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक 14 मधील आरक्षित भूखंड संत तुकाराम महाराज पालखी तळ येथे मनपा जागेत अनधिकृत स्टॉल लावण्यात आलेले आहेत. त्या स्टॉलवर लवकरात लवकर कारवाई करावी, व संत तुकाराम महाराज पालखी स्थळ या आरक्षित भूखंड मध्ये किती जागा मनपाच्या ताब्यात आहे व किती जागा खाजगी मालकीची आहे. याचा खुलासा करावा ,अशी मागणी विठ्ठल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष निखिल दळवी यांनी मनपा आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे.
दिलेल्या पत्रात निखिल दळवी यांनी नमूद केले आहे की, प्रभाग क्रमांक 14 मधील आरक्षित जागेत अनधिकृत विक्री स्टॉल व मंडप लावण्यात आलेले आहे. त्यावर लवकरात लवकर कारवाई करावी तसेच मनपा हद्दीतील सर्व जागेवर विक्री स्टॉल लिलाव पद्धतीने करावा व प्रत्येक स्टॉलचे भोई भाडे व मंडप भाडे मनपा दरानुसार वसूल व सर्व स्टॉलचे लिलाव पद्धतीने वितरण करावे, या सर्व बाबींवर लवकरात लवकर कारवाई करावी, अशीही मागणी निखिल दळवी यांनी केली आहे.