पिंपरी – भाजपा नगरसेविका तथा महिला व बाल कल्याण समिती सभापती चंदा लोखंडे यांचे पती माजी नगरसेवक राजू रामा लोखंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (दि. २०) रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.नगरसेविका चंदा लोखंडे या भाजप चिन्हावर निवडून आलेले आहेत परंतु आता त्यांचे पती माजी नगरसेवक राजू लोखंडे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याने सर्वत्र याबाबतची चर्चा होत आहे. राजू लोखंडे हे आमदार लक्ष्मण जगताप यांचे कट्टर समर्थक मानले जातात त्यामुळे आता येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकी पर्यंत राष्ट्रवादीत कोण कोणते नेते जाहीर प्रवेश करणार आहेत हे येणारा काळच सांगेल