शबनम न्यूज / पुणे
युनिव्हर्सल क्रिएशन संस्थेतर्फे श्री.नागेश हुलावळे आणि सौ.प्रतिमा काळे यांना नुकताच विश्व विक्रमवीर डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्या शुभहस्ते ऑनलाईन ‘होरायझन इंटरनॅशनल ॲवाॅर्ड-2021’ प्रदान करण्यात आला.सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून सामाजिक आणि विधायक उपक्रमांच्या संदर्भात उच्च आदर्शवादाची मूल्य जतन सातत्याने करत राहिल्यामुळेच या योगदानाची
आंतराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली,असे डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी सागितले.कुठल्याही कलेला जेव्हा
अध्यात्माचे अधिष्ठान असते,तेव्हा त्या कलेतून शाश्वत आनंद मिळतो, असेही डाॅ.मधुसूदन घाणेकर पुढे म्हणाले.या कार्यक्रमास अक्षरमंच प्रतिष्ठानचे संस्थापक.अध्यक्ष डाॅ.योगेश जोशी, सचिव हेमंत नेहते
सामाजिक कार्यकर्त्या सौ.जयश्री कुलकर्णी,मधुरंग संस्थेचे सहसचिव यशवंत गरड आदि मान्यवर उपस्थित
होते.
Advertisement