शबनम न्युज | पुणे
पुणे | प्रतिनिधी
परिवहन संवर्गातील वाहनाचा योग्यता प्रमाणपत्र नुतणीकरणासाठी 28 ऑगस्ट रोजी शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याचे पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी कळविले आहे.
उप प्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी- चिंचवड कार्यालयात परिवहन संर्वगातील वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नुतणीकरणासाठी कार्यालयात मालवाहतुक वाहना साठी 100, टुरिस्ट टॅक्सी 25, ऑटो रिक्षा 25, तीन चाकी मालवाहतुक वाहने 04, बस 12 या प्रमाणे कोटा ठेवण्यात आला आहे.
वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र नुतरणीकरण करिताच्या ऑनलाईन अपॉइंटमेंटचा प्रतिक्षा कालावधी कमी करण्याच्या उद्देशाने नियोजित तारीख घेऊन महिन्याच्या प्रत्येक शनिवारी देखील योग्यता प्रमाणपत्राचे कामकाजाकरीता विशेष शिबीराचे आयोजन करण्यात येत आहे. शिबीराची कार्यवाही दि. 28 ऑगस्ट 2021 रोजी पासून सकाळी 9 वाजले पासून अयोजीत केलेले आहे.
तरी सर्व वाहन चालक,मालक यांना सुचित करण्यात येते की त्यांनी वाहन तपासणी साठी हे प्रत्येक महिन्याच्या प्रत्येक शनिवारी देखील नियोजित तारीख घेऊन वाहनासह कार्यालयात उपस्थित रहावे.