शिक्षण सभापती नगरसेविका मनीषा पवार यांची मागणी
शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक 23 मधील बी आर टी रोड धनगर बाबा चौक परिसरात पदचारी (स्कायवॉक) उभारावे, अशी मागणी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या भाजप नगरसेविका व विद्यमान शिक्षण समिती सभापती मनीषा प्रमोद पवार यांनी मनपा आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे.
दिलेल्या निवेदनात मनीषा प्रमोद पवार यांनी नमूद केले आहे की, या संदर्भात अनेकदा पत्रव्यवहार करण्यात आले आहे. परंतु याबाबतची कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. खेडेगावातील धनगर बाबा मंदिरामध्ये ग्रामस्थ व दैनंदिन देवदर्शनासाठी येत असतात. तसे काळेवाडी फाटा ते पिंपरी दरम्यान हा मुख्य रस्ता असल्यामुळे सदर रस्त्यावर रहदारी खूप मोठ्या प्रमाणात असते. गेल्या काही वर्षांमध्ये सदर रस्ता ओलांडतांना अपघाताचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढले असून, सदर परिसरातील नागरिकांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागतो. याबाबत प्रभागातील नागरिकांनी अनेकदा तक्रारी केल्या आहेत. तरी माझी आयुक्तांना अशी विनंती आहे की, नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सदर परिसरात चालू आर्थिक वर्षात तरतूद करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देऊन लवकरात लवकर धनगर बाबा चौक परिसरात पादचारी पूल स्काय वॉक उभारण्यात यावे. असेही नगरसेविका मनीषा प्रमोद पवार यांनी निवेदनात म्हंटले आहे.