शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड| प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड दापोडी विभागातील भूमी कन्या महिला आघाडीच्या शिवसेनेचे युवा नेता सौ. सुषमा शेलार यांनी आयुक्तांची नदी जल प्रदूषण व ब्लू लाईन अतिक्रमण कारवाई संदर्भात भेट घेतली. पिंपळे गुरव परिसर जोडणारा नदी पुला कडील अनधिकृतपणे व कृत्रिमरीत्या नदीपात्र अरुंद करून बलाढ्य प्रमाणात भंगार व इतर व्यवसाय थापीत करून अवाजवी वास्तव निर्माण झाले आहे. परिणामी नदी व नदीपात्राचा अवैध्या वापर सुरु करून मनमानी माजवून कचरा व घाणीचे साम्राज्य निर्माण होत आहे परिणामी नदीची व नदीकाटची रहिवाशी वस्तीची दुर्दशा हा वाहणारा कचरा कृत्रिमरीत्या व्यवसाय फायद्यासाठी केलेले नदी व नदीपत्राचे केलेले अरुंदी करण हा कदाचित एकाच ठिकाणचा बोजा दुसर्या ठिकाणी त्रासदायक ठरत आहे. दापोडी हा परिसर दोन नदींच्या संगमाच्या काठावर आहे. व्यवस्थापानाच्या अभावी नदीचे व्यासपीठ धोकादायक पद्धतीने वाढत आहे. संधार्भीत दापोडी करांना नेहमी प्रमाणे पुराचा धोका निदर्शनास येत आहे.
सदर विषयाचे गांभीर्य चर्चेत घेऊन खासदार श्रीरंग अप्पा बारणे¸ आमदार गौतम चाबुकस्वार यांनी पाहणी करून सामाजिक कार्यकर्ता शिवसेना महिला आघाडीच्या सुषमा अजित शेलार यांच्या मार्फेत पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याशी भेट घेऊन निदर्शनास आणून दिले.
सदर चर्चेमध्ये सक्तीची कारवाई १ महिन्यामध्ये करण्यात येईल पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील यांनी आश्वासन दिले. वास्तविक हे काम नगरसेवक यांचे असून त्रुटीपाई सामाजिक कार्यकर्ता शिवसेना महिला आघाडीच्या सुषमा अजित शेलार यांनी आमदार व खासदार साहेब यांच्या सानिध्यात दापोडी करांची समस्या आयुक्त साहेबांकडे आज रोजी यशवी रित्या पोहचवली. अशी माहिती सुषमा शेलार यांनी दिली.