शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
आज महापौर उषामाई ढोरे व आयुक्त राजेश पाटिल यांना वरील विषयी भारतीय जनता युवा तर्फे आयुक्तांना निवेदन देण्यात आले तसेच त्यांच्या मेट्रो विभाग अधिकारी आणि राज्य सरकार यांच्याशी होणाऱ्या आगामी बैठकीत नामकरणाचा हा मुद्दा मांडून पुणे मेट्रो चे नामकरण “पिंपरी चिंचवड पुणे मेट्रो” असे करण्यात यावे ही आमची पिंपरी चिंचवडकरांची मागणी पुर्ण करावी अशी मागणी करण्यात आली.
पुणे मेट्रो मध्ये आपल्या शहराचा मोलाचा वाटा असुन मेट्रोला फक्त पुणे मेट्रो असे नाव न देता “पिंपरी चिंचवड पुणे मेट्रो” असे नाव देण्यात का अडचणी आहेत किमान ते तरी कळवावे.
जर शासनाने यावर लवकरात लवकर निर्णय घेऊन “पिंपरी चिंचवड पुणे मेट्रो” असे नाव नाही केले तर हे आम्ही शहरवासीय हे आंदोलन आणखी तीव्र करणार व जागोजागी याचा निषेध करणार.
यावेळी पक्षनेते नामदेवजी ढाके, युवा मोर्चा अध्यक्ष संकेत चोंधे, सरचिटणीस जवाहर ढोरे, तेजस्विनी कदम, उपाध्यश स्विकृत नगरसेवक संदिप नखाते, विक्रांत गंगावणे व सारिका माळी हे उपस्थित होते.