आपल्या विभागात अनोळखी रिक्षाचालक फिरत असल्याचे आढळल्यास पोलिसांच्या ताब्यात देण्यात यावे,
( आळंदी देहु फाटा येथे संत कृपा रिक्षा स्टँडचे उद्घाटन )
शबनम न्यूज | आळंदी
पुणे शहरात अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला या घटनेचा सर्व रिक्षाचालक-मालक यांच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करत आहोत, बलात्कार,करणाऱ्या नराधमस जात, धर्म, पंथ नसतो तो एखाद्या समुदायाचा चेहरा घेऊ शकत नाही, रिक्षा व्यवसायात घुसुन असे अपराध करणाऱ्यांना रिक्षा चालक मालकांनी ओळखून त्यांना वेळेच पोलिसांच्या ताब्यात दिले पाहिजे, लायसन्स बॅच नसणारे अनेक व्यक्ती रिक्षा व्यवसाय मध्ये अतिक्रमण करून रिक्षाचालकांची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत अशांना वेळीच पायबंद घालण्याने आवश्यक आहे,
पोलीस प्रशासनाने रिक्षाचालकांच्या सातत्याने बैठका घेऊन त्यांना विश्वासामध्ये घेतला पाहिजे रिक्षा चालक पोलीस प्रशासन आणि नागरिक एकत्र आल्यास असे प्रसंग घडणार नाहीत यापुढे असे प्रसंग घडू नये यासाठी रिक्षाचालकाने जागृत राहावे असे मत महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी व्यक्त केले,
आळंदी देऊ फाटा येथे महाराष्ट्र रिक्षा पंचायत सलग्न संतकृपा रिक्षा स्टँडच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते,
यावेळी पोलीस निरीक्षक रविंद्र जाधव, विद्यमान उपनगराध्यक्ष पारूबाई तापकीर,नगरसेवक सचिन गिलबिले, माजी नगरसेवक अशोक उमरगिकर, नगरसेवक पांडुरंग वहिले, नगरसेवक दिनेश घुले, नगरसेवक गणेश राहणे , सामाजिक कार्यकर्ते विजुशेठ तापकीर, युवा कार्यकर्ते संदीप तापकीर , युवा उद्योजक पद्माकर तापकीर सामाजिक कार्यकर्ते आबासाहेब तापकीर, युवा नेते किशोर पवार, टपरी पथारी हातगाडी पंचायत पुणे जिल्हाध्यक्ष मल्हारभाऊ काळे , रिक्षा ब्रिगेड महाराष्ट्र प्रमुख बाळासाहेब ढवळे, महाराष्ट्र रिक्षा पंचायत शहर उपाध्यक्ष सुरज सोनवणे ,रिक्षा ब्रिगेड शहर सह उपाध्यक्ष सिद्धेश्वर सोनवणे, रिक्षा ब्रिगेड प्रवक्ते अविनाश जोगदंड ,महाराष्ट्र रिक्षा पंचायत आळंदी चर्होली विभाग प्रमुख दिनेश तापकीर, संत कृपा रिक्षा स्टॅन्ड चे संस्थापक रमेश शेठ सोपानराव वहिले ,आदी उपस्थित होते,
यावेळी पोलीस निरीक्षक रविंद्र जाधव म्हणाले, आपल्या परिसरात अनअनोळखी रिक्षाचालकांच्या वेशात कोणी फिरत असेल तर मला कळवा, आपल्या परिसरातील रिक्षा चालक चांगले आहेत, आत्तापर्यंत कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही, कुठेही घडू नये यासाठी रिक्षाचालकांना विभागवार ओळखपत्र देता येतील का याबाबत विचार व्हावा,
माजी नगरसेवक अशोक उमरगिकर म्हणाले आळंदी महानगरपालिकेच्या वतीने नवीन रिक्षा स्टँडला मान्यता देण्यात येईल यासाठी आळंदी नगरपरिषदे मदे बाबा कांबळे, आणि पोलिस प्रशासन वाहतूक शाखा अधिकारी यांच्या उपस्थितीत लवकरच बैठक घेण्यात येईल, रिक्षाचालकांचे इतरही प्रश्न सोडवू,
कार्यक्रमाच्या संयोजनासाठी स्टँड अध्यक्ष संतोष गुंड, उपाध्यक्ष मिलिंद गंगावणे, संपत भोसले, नंदू शेळके, मनोज कागदे ,सचिन बिडकर ,संतोष मस्के ,किशोर पवार ,समीर शेख, अंबादास केंदळे, संदीप कुदुंप, यांनी परिश्रम घेतले.