शबनम न्यूज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड शहरातील महानगरपालिकेचे प्रभाग क्रमांक 24 मध्ये सौ.करिश्मा सनी बारणे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन चिंचवड विधानसभा मतदार संघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
भारतीय जनता पक्षाचे वतीने तसेच करिश्मा सनी बारणे यांच्या माध्यमातून प्रभागातील नागरिकांच्या विविध अडीअडचणी सोडविण्यासाठी या जनसंपर्क कार्यालयाच्या मार्फत प्रयत्न केले जाणार असून त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे वतीने प्रभागातील नागरिकांना प्रशासन, शासन वतीने अनेक योजनांचा लाभ मिळणार आहे.
त्यांचे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी भाजप नगरसेविका, शिक्षण समिती सभापती मनिषा पवार, नगरसेवक अभिषेक बारणे, प्रभाग सदस्य संदीप गाडे, ज्येष्ठ नगरसेविका झामाताई बारणे, माजी नगरसेवक सिद्धेश्वर बारणे, भाजपचे काळुराम बारणे, स्वीकृत सदस्य संदीप नखाते, महिला आघाडी भाजपा अध्यक्षा उज्वलाताई गावडे, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष संकेत चोंधे, सामाजिक कार्यकर्ते तानाजी बारणे, माजी स्वीकृत सदस्य गोरक्षनाथ पाषाणकर, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप भिंगारे, सामाजिक कार्यकर्ते शामराव गुजर, सामाजिक कार्यकर्ते कानिफनाथ गुजर, सामाजिक कार्यकर्ते काशिनाथ बारणे, माजी उपसरपंच प्रसाद खानेकर , युवा नेते प्रमोद भाऊ पवार, युवा नेते बाळा दळवी, प्रसाद कस्पटे,सामाजिक कार्यकर्ते हरिश्चंद्र बारणे, ज्येष्ठ नेते हरीश आप्पा मोरे, ऍड. गोरक्षनाथ झोळ, युवा नेते अजिंक्य बारणे, नवीन तापकीर, महेश बारणे, संतोष बारणे, आदी मान्यवर उपस्थित होते. या सर्व उपस्थितांचे करिश्मा सनी बारणे यांनी आभार व्यक्त केले.