शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या पाठपुराव्या मुळे संरक्षण विभागाने बोपखेल पुलाचे बांधकामाचे परवानगी दिली आहे. दिनांक १८ ॲागस्ट रोजी युवासेनेच्या प्रतिक्षा लक्ष्मण घुले व त्यांच्या शिष्टमंडळाने खासदार श्रीरंगआप्पा बारणे यांना बोपखेल पुलाच्या संदर्भात सविस्तर निवेदन दिले होते. त्यावेळी बोपखेल पुलाचे काम युद्धपातळीवर चालु करणार असा शब्द दिला होता. तो शब्द आप्पांनी पाळला त्यामुळे बोपखेलकर आनंदाने भारावून गेला आहे. समस्त बोपखेल, रामनगर, गणेशनगर ग्रामस्थांच्या वतीने खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
बोपखेल ते खडकीला जोडणा-या मुळा नदीवरील उड्डाणपुलाचे रखडलेले काम लवकरच मार्गी लागणार आहे. पुलाच्या प्रत्यक्ष कामाला सुरूवात करण्यासाठी केंद्रीय संरक्षण विभागाची अंतिम परवानगी नुकतीच मिळाली आहे. मावल लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीरंग बरणे यांच्या माध्यमातून हा प्रश्न सोडविण्यात यश आले आहे. लष्कराच्या हद्दीतील बोपखेल ते खडकी जोडणा-या उड्डाण पुलाच्या कामाचा प्रश्न सुटल्याने बोपखेलवासियांची या त्रासातून कायमची मुक्तता होणार आहे.